पिंपरीत बेड मिळवण्यासाठी रुग्णाला करावी लागते कसरत, आता रुग्णवाहिका मिळण्यातही अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 11:02 AM2021-04-19T11:02:57+5:302021-04-19T11:31:28+5:30

रुग्णाला घेऊन तासंतास फिरल्याने रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपण्याची भीती

The patient has to work hard to get a bed in Pimpri, now there are difficulties in getting an ambulance | पिंपरीत बेड मिळवण्यासाठी रुग्णाला करावी लागते कसरत, आता रुग्णवाहिका मिळण्यातही अडचणी

पिंपरीत बेड मिळवण्यासाठी रुग्णाला करावी लागते कसरत, आता रुग्णवाहिका मिळण्यातही अडचणी

Next
ठळक मुद्देगंभीर रुग्णांना दाखल करण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिकेची गरज

पिंपरी: शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन आणि आयसीयू बेड मिळणे कठीण झाले आहे. परिणामी रुग्णांना रुग्णवाहिकेतूनच तास अन तास फिरावे लागत असल्याची स्थिती आहे. एका रुग्णाला एक ते दोन तास घेऊन फिरल्याने रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपतो. त्यामुळे ऐनवेळी काय करावे असा प्रश्न रुग्णवाहिका चालकाला आणि रुग्णाच्या नातेवाईकाला पडतो. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णवाहिकेला ऑक्सिजन मिळण्यास अडचण येत आहे.

 पुणे आणि पिंपरीत सध्या गंभीर रुग्णांची संख्या वाढल्याने कार्डियाक रुग्णवाहिका आणि इतर रुग्णवाहिकांची मागणी वाढली आहे. त्यामुळे रुग्णवाहिका मिळण्यास वाट पहावी लागत आहे. वाट पाहून रुग्णवाहिका मिळते. पण बेड मिळत नसल्याचे चित्र सध्या शहरात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ऑक्सिजन बेड नाही मिळाला तर रुग्णाला पुण्यात घेऊन जावे लागते. तर पुण्यातला रुग्णाला बेड नाही मिळाला तर पिंपरी मिळेल या आशेने  तो येतो. पण इथेही त्याला बेड मिळत नसल्याची स्थिती आहे. रुग्ण संख्या वेगाने वाढत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. 

खाजगी रुग्णवाहिका १५० 

महापालिका रुग्णालयासाठी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका : ३७, इनोव्हा तत्सम प्रकारची वाहने : ५८
मिनी बस : २,  एकूण ९७ 


कार्डियाकची सर्वाधिक मागणी 

गंभीर रुग्णांना दाखल करण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिकेची गरज असते. परंतु या रुग्णवाहिका कमी असल्याने वेळेत मिळणे कठीण झाले आहे. 

तक्रार कुठे करायची ? 

रुग्णवाहिका वेळेत मिळाली नाही ? किंवा जादा पैसे मागितले तर तक्रार कुठे करायची असा प्रश्न आहे. अनेकांना या बाबत माहितीच नाही. त्यामुळे याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. 

विचारणा केली असता 

पिंपरी ते पुणे जाण्यासाठी सध्या १५०० रुपये घेतले जात आहे. पूवी १२०० घेतले जात होते. आता ऑक्सिजनचे डिझेलचे भाव वाढल्याने १५०० घेत आहे. सध्या जवळपास ९० टक्के रुग्णवाहिकेत ऑक्सिजन आहे. बेड मिळणे कठीण झाल्याने एकाच रुग्णासाठी जास्त वेळ लागत आहे. त्यामुळे इतर रुग्णांना रुग्णवाहिका मिळण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. असे रुग्णवाहिका चालकाने सांगितले.
 

Web Title: The patient has to work hard to get a bed in Pimpri, now there are difficulties in getting an ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.