पाटसला दरोड्याच्या तयारीतील तिघांना अटक
By Admin | Updated: August 18, 2014 05:13 IST2014-08-18T05:13:41+5:302014-08-18T05:13:41+5:30
परिसरात सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्या तिघांना अटक करण्यात आली. तर दोघे फरार झाले असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे सुनील वाणी यांनी दिली.

पाटसला दरोड्याच्या तयारीतील तिघांना अटक
पाटस : परिसरात सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्या तिघांना अटक करण्यात आली. तर दोघे फरार झाले असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे सुनील वाणी यांनी दिली.
सतिश वाघमारे (वय २५ रा. वाघोली), विलास बढे (वय ३0 रा. वाघोली), मंगेश वाघमारे (वय ३५ रा. खोपोली) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक जीप, लॅपटॉप, फावडयाचे दांडके, चाव्यांचा जुडगा, लोखंडी चैन, साखळी, मिरचीची पुड, हातोडी व इतर हत्यारे जप्त केले आहेत.
पाटस- दौंड रोडवर रात्रीच्या सुमाराला फौजदार सुभाष कांबळे, हरिष शितोळे, बच्चाराम भिसे हे गस्त घालत होते. यावेळी गारफाटा येथे अंधारात एक जीप (क्र. एम. एच. १२ बी.पी. ५९३५) उभी होती. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी हाटकले असता, दोघेजण अंधाराचा फायदा घेत पळून गेले. तिघांना ग्रामसुरक्षा दलाचे कार्यकर्ते सुरेश भागवत व त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी फौजदार सुभाष कांबळे त्यांचे सहाय्यक सुनील वाणी, संतोष मदने तपास करीत आहे. (वार्ताहर)