पाटसचा तोतया सामाजिक कार्यकर्त्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:08 IST2021-07-22T04:08:34+5:302021-07-22T04:08:34+5:30
पोलीस निरिक्षक नारायण पवार यांनी दिली. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार अष्टविनायक रस्त्यावरील पारगाव ते दौंड मार्गावरील ...

पाटसचा तोतया सामाजिक कार्यकर्त्याला अटक
पोलीस निरिक्षक नारायण पवार यांनी दिली. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार अष्टविनायक रस्त्यावरील पारगाव ते दौंड मार्गावरील मुरूम टाकण्याच्या काम चालू आहे. मुरुम टाकण्याच्या कामासाठी तहसील कार्यालयाची अधिकृत परवानगी होती.
दरम्यान मंगळवार ( दि. २० ) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बेडवाडी परिसरातील रस्त्यालगत (टिपर गाडी नं. एम.एच. ऐ. क्यू. ७९३२) वरील चालक संतोष भुजबळ मुरुम टाकण्यासाठी जात असताना यावेळी राजेश लाड याने टिपर चालकाला दमदाटी करुन मुरमने भरलेला टिपर मोकळ्या जागेत खाली करण्यास सांगितले. ही बाब टिपर मालक अंकुश वणवे यांना कळल्यावर ते तातडीने घटनास्थळी गेले तेव्हा राजेश लाड याने वणवे यांना लाख रुपये मागितले. त्यामुळे वणवे यांनी मुरुम व्यवसायातील काही मित्रांना बोलावून घेतले, त्यातील मित्र राजेंद्र घाडगे यांनाही यापूर्वी त्यांनी वीसहजार रुपये घेतले असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार त्या साऱ्यांनी लाड याच्याविरुध्द पोलिसात फिर्याद दिली.