पाटसला लग्नात २ लाखांचे सोने लंपास

By Admin | Updated: June 10, 2014 22:56 IST2014-06-10T22:41:00+5:302014-06-10T22:56:11+5:30

पाटस (ता. दौंड) येथील एका मंगल कार्यालयातून २ लाख रुपयांचे ११ तोळे सोने लंपास झाले असल्याची माहिती सहायक फौजदार सुरेश रोकडे यांनी दिली.

Patals get two lakh gold lamps in marriage | पाटसला लग्नात २ लाखांचे सोने लंपास

पाटसला लग्नात २ लाखांचे सोने लंपास

पाटस : पाटस (ता. दौंड) येथील एका मंगल कार्यालयातून २ लाख रुपयांचे ११ तोळे सोने लंपास झाले असल्याची माहिती सहायक फौजदार सुरेश रोकडे यांनी दिली. या प्रकरणी मानसिंग शितोळे (रा. देशमुखवस्ती, पाटस, ता. दौंड) यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. मानसिंग शितोळे यांच्या मुलीचा विवाह दुपारी होता. त्यानुसार नवरी मुलीला दागिने आणले होते. नवरीच्या कानात झुबे असल्याने नवीन झुबे घातले नव्हते, तर तिने हातात लग्नाचा चुडा भरलेल्या असल्याने पाटल्या आणि बांगड्या हातात बसल्या नाही. तेव्हा झुबे, चार बांगड्या, दोन पाटल्या, असे १0 तोळे ९00 ग्रॅम सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवूनही दागिन्याची पर्स नवरी मुलीच्या खोलीत आहेराच्या कपड्याखाली ठेवलेली होती. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पर्स चोरून नेली. दरम्यान, पर्स चोरीला गेल्याचे समजल्यानंतर मंगल कार्यालयात सर्वत्र पर्सचा शोध घेतला, मात्र हाती काही आले नाही. या प्रकरणी यवतचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सुरेश रोकडे अधिक तपास करीत आहेत.



सीसी टीव्ही कॅमेर्‍याची सक्ती करावी
मंगल कार्यालयात विवाह निमित्ताने गर्दी असते तेव्हा लग्नकार्यात पाळत ठेवून चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. मंगल कार्यालयातून सोने चोरीला जाण्याचा प्रकार पाळत ठेवूनच केला असल्याचे बोलले जाते. तेव्हा सर्वच मंगल कार्यालयांत सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे की जेणे करून चोरीचे प्रमाण कमी होईल.

 

Web Title: Patals get two lakh gold lamps in marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.