पासचा तीन कोटींचा प्रसाद

By Admin | Updated: September 7, 2016 01:50 IST2016-09-07T01:50:42+5:302016-09-07T01:50:42+5:30

प्रवासीवाढीसाठी पीएमपीकडून सुरू करण्यात आलेल्या दररोजच्या सवलतीच्या पासमुळे पीएमपीला महिन्याला मिळणाऱ्या पासच्या उत्पन्नाने विक्रमी आकडा गाठला आहे

Passing three crore prasad | पासचा तीन कोटींचा प्रसाद

पासचा तीन कोटींचा प्रसाद

पुणे : प्रवासीवाढीसाठी पीएमपीकडून सुरू करण्यात आलेल्या दररोजच्या सवलतीच्या पासमुळे पीएमपीला महिन्याला मिळणाऱ्या पासच्या उत्पन्नाने विक्रमी आकडा गाठला आहे. आॅगस्ट महिन्यात अवघे १५ दिवस असलेल्या या सवलतीने पीएमपीच्या मासिक पासच्या उत्पन्नात तब्बल ३ कोटींची भर घातली असून, हा आकडा ११ कोटींच्या घरात पोहोचला आहे.
जुलै २०१६ मध्ये हेच पासचे उत्पन्न ८ कोटी २२ लाख रुपये होते. मात्र, या सवलतीचा पासमुळे मासिक आणि साप्ताहिक व मासिक पासच्या विक्रीमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. या प्रवाशांनाही दैनंदिन पासलाचा पसंती दिली असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीमधून समोर आले आहे.
‘संगमवाडी ते विश्रांतवाडी’ या मार्गाच्या वर्षपूर्ती निमित्ताने पीएमपी प्रशासनाकडून दैनंदिन पासची किंमत ७० रुपयांवरून ५० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सवलत अवघी १५ दिवस देण्यात येणार होती.
ही सवलत देण्यापूर्वी म्हणजेच, १४ आॅगस्टपूर्वी दिवसाला ३ हजार पासची विक्री होत होती.
तर, १४ आॅगस्टपर्यंत १५ हजार
पासची विक्री झाली. मात्र, सवलतीनंतर
या पासच्या विक्रीत कित्येक पटींनी
वाढ झाली. प्रवाशांनी या पासवर
अक्षरश: उड्या घेतल्या. त्यामुळे या
पासची विक्री आॅगस्टच्या शेवटच्या दोन आठवड्यात थेट ३ लाख ६६ हजारांच्या घरात गेली.

Web Title: Passing three crore prasad