इंदापूर बसस्थानकातील असुविधांमुळे प्रवासी त्रस्त

By Admin | Updated: March 29, 2017 00:08 IST2017-03-29T00:08:53+5:302017-03-29T00:08:53+5:30

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असणारे इंदापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाचे इंदापूर बसस्थानक

Passengers suffer due to incompatibility of Indapur bus station | इंदापूर बसस्थानकातील असुविधांमुळे प्रवासी त्रस्त

इंदापूर बसस्थानकातील असुविधांमुळे प्रवासी त्रस्त

इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असणारे इंदापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाचे इंदापूर बसस्थानक हे प्रवाशांसाठी सोईचे ठिकाण आहे. रोज हजारो प्रवासी ये-जा करत असतात. पण सध्या उन्हाचे प्रमाण वाढले आहे. या बसस्थानकातील असुविधांमुळे प्रवाशी त्रस्त आहेत. बसस्थानकातील पंखे सुरु नाहीत. पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय नाही.
बस वेळेवर न आल्यामुळे प्रवाशांना बराच वेळ थांबावे लागते. उन्हामुळे वातावरणातील गरमी वाढत आहे. बसस्थानकात पंखे असून नसल्यासारखेच दिसून येत आहेत. कारण ते कधी चालूच न केल्याचे समजते. याबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. यावर आगार व्यवस्थापन विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. पिण्याचे पाणी अस्वच्छ आहे. (वार्ताहर)

Web Title: Passengers suffer due to incompatibility of Indapur bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.