प्रवासी एकीकडे अन् थांबा दुसरीकडे
By Admin | Updated: August 7, 2015 00:22 IST2015-08-07T00:22:12+5:302015-08-07T00:22:12+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने कर्वेनगर भागात नव्याने बस थांबे बसविण्यात आले आहेत. प्रत्यक्षातील बस थांबा अन् उभारण्यात आलेले

प्रवासी एकीकडे अन् थांबा दुसरीकडे
कोथरूड : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने कर्वेनगर भागात नव्याने बस थांबे बसविण्यात आले आहेत. प्रत्यक्षातील बस थांबा अन् उभारण्यात आलेले थांबे यांमध्ये तफावत असल्याने प्रवाशांना उघड्यावरच बसची वाट पाहावी लागत आहे.
कर्वेनगर भागातील पूर्वीपासून वडाचा स्टॉप हा बस थांबा असून या बस थांब्यावर प्रवाशांना उघड्यावरच बसची वाट पाहावी लागत आहे. वडाचा स्टॉप भागातील दोन्ही बस थांबे बसवविण्यासाठी भाजपाचे सचिन फोलाने यांनी पाठपुरावा केला होता. या मागणीनुसार पुणे महापालिकेच्या वतीने पुणे शहराकडे जाणाऱ्या मार्गावर बस थांबा बसवला. परंतु वारज्याकडे जाणाऱ्या मार्गावर आजही प्रवाशांना उघड्यावरच वाट पाहावी लागत आहे. महापालिकेच्या वतीने आठ दिवसांत वनदेवीलगत बस थांबा नसलेल्या ठिकाणी दोन बस थांबे उभारण्यात आले. या दोन्ही बस थांब्यांचे वडाचा स्टॉप येथे स्थलांतर करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)