शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

बस बाहेर तर प्रवासी अात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 15:24 IST

संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गावर एकाच बाजूला दार असलेल्या काही बसेस पाठविण्यात येत अाहेत. परिणामी या बसेस बीअारटी मार्गाच्या बाहेरुन जात असल्याने प्रवाशांनी नेमके कुठे थांबायचे असा प्रश्न निर्माण झाला अाहे.

पुणे : सार्वजनिक वाहतूक जलत व्हावी यासाठी काही वर्षांपूर्वी बीअारटी अर्थात जलद बस वाहतूक सेवा पुण्यातील काही मार्गांवर सुरु करण्यात अाली. परंतु ही याेजना सुरु करण्यात अाल्यापासूनच या याेजनेतील अनेक त्रृटी समाेर अाल्या. एकीकडे अनेक दिवसांपासून बीअारटी बसस्टाॅपचे दरवाजे नादुरुस्त असतानाचा अाता बीअारटी मार्गासाठी असणाऱ्या बसेस नादुरुस्त असल्याने जुन्या एका बाजूस दरवाजा असलेल्या बसेस संगमवाडी ते विश्रांतवाडी या बीअारटी मार्गावर साेडण्यात येत अाहेत. परिणामी या बसेस बीअारटी मार्गाच्या बाहेरुन जात असून बीअारटी बसस्टाॅपमध्ये थांबायचे की बाहेर अश्या व्दिधा मनस्थितीत प्रवासी असल्याचे पाहायला मिळत अाहे. त्यामुळे बस बाहेरुन तर प्रवासी बसस्टाॅपमध्ये असे चित्र सध्या येथे पाहायला मिळत अाहे.     उपनगरातील लाेकांना लवकरता लवकर शहरात येता यावे, तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा असा बीअारटी मार्ग सुरु करण्यामागील उद्देश हाेता. परंतु बीअारटी याेजना याेग्य पद्धतीने राबविण्यात येत नसल्याने या याेजनेचा बट्याबाेळ झाल्याचे चित्र अाहे. गेल्या काही दिवसांपासून संगमवाडी ते विश्रांतवाडी या बीअारटी मार्गावर काही जुन्या बसेस साेडण्यात येत अाहेत. या मार्गावर बीअारटीचे बसस्टाॅप हे रस्त्याच्या मधाेमध अाहेत. त्यामुळे उजवीकडील दरवाजा उघडणाऱ्या बसेस या मार्गावरुन धावणे अपेक्षित अाहे. त्याचबराेबर हे बसस्टाॅप काहीश्या उंचीवर असल्याने तसेच दाेन्ही बाजूंनी दुभाजक असल्याने या बसस्टाॅपच्या बाहेर थांबणे शक्य नाही. या मार्गासाठी केवळ उजव्या बाजूचे दरवाजे उघडणाऱ्या बसेस साेडणे अपेक्षित असताना, काही जुन्या बसेस या मार्गावर साेडण्यात येत असल्याने त्या बसेस बीअारटी मार्गाच्या बाहेरील बाजूने जात अाहेत. त्यामुळे यातील बहुतांश बसेस या रिकाम्याच जात असून प्रवाशांमध्ये सुद्धा संभ्रमाचे वातावरण अाहे.     सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीअारटी मार्गासाठी साेडण्यात येणाऱ्या अनेक बसेस या खाजगी ठेकेदारांच्या अाहेत. त्यातील अनेक बसेसचे उजवे दरवाजे हे काही दिवसांपासून नादुरुस्त अाहेत. या बसेसच्या देखभालीकडे ठेकेदारांकडून लक्ष देण्यात येत नाही. तसेच पीएपीच्या मालकीच्या अनेक बसेसही नादुरुस्त अाहेत. परिणामी पीएमपीला या मार्गावर जुन्या बसेस साेडाव्या लागत अाहेत. या बसेस रिकाम्याच जात असल्याने पीएमपीला अार्थिक भुर्दंड सुद्धा साेसावा लागत अाहे. पीएमपीच्या या गलथान कारभरामुळे अनेक नागरिक बस एेवजी स्वतःच्या वाहनाने प्रवास करु लागले अाहेत. त्यामुळे या मार्गावर याेग्य बसेस साेडणार का, असा प्रश्न अाता प्रवासी विचारत अाहेत.     याबाबत बाेलताना पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय माने म्हणाले, बीअारटी मार्गावर दाेन्ही बाजूंना दरवाजे असलेल्या बसेस साेडण्यात येतात. या बसेस पैकी काही बसेस या नादुरुस्त अाहेत. पीएमपीच्या मालकीच्या 200 बसेसची देखभाल ही एक खाजगी कंपनीकडे हाेती. त्या कंपनीकडून पीएमपीच्या बसेस परत घेण्यात अाल्या अाहेत. त्यातील 50 बसेस या नादुरुस्त अाहेत. त्याचबराेबर खासगी ठेकेदारांच्या अनेक बसेसही नादुरुस्त अाहेत. त्यामुळे संगमवाडी-विश्रांतवाडी बीअारटी मार्गावर एकाच बाजूला दरवाजा असलेल्या काही बसेस साेडण्यात येत अाहेत. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे व इतर अडचणींमुळे नादुरुस्त बसेस दुरुस्त झाल्या नाहीत. नादुरुस्त बसेस लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येणार अाहेत.

टॅग्स :PuneपुणेPune BRTपुणे बीआरटीVishrantwadiविश्रांतवाडीPMPMLपीएमपीएमएल