शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी वाहनांचे होणार ‘ट्रॅकिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 02:33 IST

ट्रॅकिंग डिव्हाईस, आपत्कालीन बटण बंधनकारक; १ जानेवारीपासून होणार अंमलबजावणी

पुणे : सार्वजनिक प्रवासी वाहनांना आता यापुढे ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ आणि आपत्कालीन बटण बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही दोन्ही उपकरणे असल्याशिवाय वाहनांना नोंदणी किंवा तपासणी करतेवेळी योग्यता प्रमाणपत्र दिले जाणार नाही. दरम्यान, ही उपकरणे वाहनांमध्ये बसविण्यासाठी डिसेंबरअखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, राज्यातील काही प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.केंद्र सरकारने याबाबतची अधिसूचना दि. २५ आॅक्टोबर रोजी जारी केली आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतूक वाहनांसाठी ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ आणि आपत्कालीन बटण असा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यातील काही आरटीओकडून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अन्य काही आरटीओमार्फत हा निर्णय लागू करण्यात आला आहे. अधिसूचना आल्यानंतर लगेचच त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी वाहतूकदारांना ही उपकरणे बसविण्यासाठी मुदत देणे आवश्यक आहे. सध्या ही उपकरणे नसल्याने वाहनांची नोंदणी तसेच योग्यता प्रमाणपत्र देणे थांबविण्यात आले आहे. या उपकरणांच्या किमतीही वाढविण्यात आल्या आहेत. वाहतूकदारांना किमान तीन महिने वेळ देण्यात यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.उपकरणे असतील तरच योग्यता प्रमाणपत्रकेंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार दुचाकी आणि तीनचाकी वाहने वगळून अन्य सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनांना ही उपकरणे बसविणे बंधनकारक असणार आहे.टॅक्सी, कॅब, मिनीबस, बस अशा सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनांचा समावेश असणार आहे. वाहनांची नोंदणी करतेवेळी ही दोन्ही उपकरणे वाहनामध्ये असणे आवश्यक आहे. तसेच योग्यता प्रमाणपत्रासाठी गेलेल्या वाहनांमध्येही ही दोन्ही उपकरणे पाहिली जातील. त्यानंतरच हे प्रमाणपत्र दिले जाईल.वाहनांमध्ये ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ व आपत्कालीन बटण बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. पण त्यासाठी डिसेंबरअखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दि. १ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. नोंदणी किंवा योग्यता प्रमाणपत्र देणे थांबविले असल्यास त्याबाबत सूचना दिल्या जातील.- बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे विभाग

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाPuneपुणे