शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

प्रवाशांची सुरक्षा धोक्यात; सुप्रिया सुळेंनी दाखवला पुण्यातील रस्त्यातला खड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 13:29 IST

पुण्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मोठा खड्डा पडला असून तो खड्डा अपघाताला निमंत्रण देत असल्याचं दिसून येत आहे.

राष्ट्रीय महामार्ग असो, राज्य महामार्ग असो किंवा गावखेड्यातील रस्ते असो, रस्त्यातील खड्ड्यांचा प्रश्न कायमच असतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने सातत्यानो ओरड होत असते. सरकार बदलल्यानंतर अनेकदा या खात्याचे मंत्रीही बदलले जातात. मात्र, रस्त्यांची दुर्दशा कायमच असते. गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्यावर असेलल्या खड्ड्यांचा प्रश्न गणेशभक्तांमुळे समोर आला होता. त्यानंतर, राज्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांच्या आणि खड्ड्यांच्या समस्या आहेत. मात्र, सर्वसामान्यांना ते सहन करावे लागते. खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुण्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. 

पुण्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मोठा खड्डा पडला असून तो खड्डा अपघाताला निमंत्रण देत असल्याचं दिसून येत आहे. एकदम गुळगुळीत रस्त्यावरील या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच, खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासह संबंधित विभागाला आपल्या ट्विटमध्ये मेंशन केलं आहे. ''चांदनी चौकातील एनडीएपासून मुळशीकडे जाणाऱ्या नव्या रस्त्यावर हा असा खड्डा पडला आहे. 'एनएचएआय'ने हे काम तपासून पाहण्याची गरज आहे. या रस्त्याचे उद्घाटन होऊन अद्याप वर्ष देखील उलटले नाही, तोवर हि स्थिती झाली. रस्त्याच्या या अशा कामामुळे प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. ही अतिशय गंभीर व खेदजनक बाब आहे,'' असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.  खासदार सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून रस्त्यावरी खड्ड्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. मात्र, हा प्रश्न केवळ पुण्यातील खड्ड्याचा नसून राज्यातील अनेक जिल्ह्यात अशाप्रकारे प्रवाशांना खड्ड्यांचा सामना करावा लागतो, त्यामुळे अपघातांची घटनांमध्ये वाढ होत आहे.  

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाPuneपुणेAccidentअपघातSupriya Suleसुप्रिया सुळेNitin Gadkariनितीन गडकरी