आळंदीच्या उपनगराध्यक्षपदी पारूबाई तापकीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:13 IST2021-08-19T04:13:21+5:302021-08-19T04:13:21+5:30

तत्पूर्वी, यापूर्वीचे उपनगराध्यक्ष सागर बोरुंदीया यांनी ठरवून दिलेल्या कालावधीत पदाचा राजीनामा दिल्याने उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले होते. त्यानुसार पीठासीन ...

Parubai Tapkir as the Deputy Mayor of Alandi | आळंदीच्या उपनगराध्यक्षपदी पारूबाई तापकीर

आळंदीच्या उपनगराध्यक्षपदी पारूबाई तापकीर

तत्पूर्वी, यापूर्वीचे उपनगराध्यक्ष सागर बोरुंदीया यांनी ठरवून दिलेल्या कालावधीत पदाचा राजीनामा दिल्याने उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले होते. त्यानुसार पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या विशेष ऑनलाइन बैठकीत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. उपनगराध्यक्ष पदासाठी पारूबाई तापकीर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने पीठासीन अधिकारी वैजयंता उमरगेकर यांनी तापकीर यांची बिनविरोध निवड घोषित केली.

याप्रसंगी मुख्याधिकारी अंकुश जाधव, नगरसेवक सचिन गिलबिले, सागर भोसले, सागर बोरुंदिया, प्रतिमा गोगावले, सुनीता रंधवे, मीरा पाचुंदे, स्मिता रायकर, प्रकाश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, स्नेहल कुऱ्हाडे, प्रमिला रहाणे, आदित्य घुंडरे, प्राजक्ता घुंडरे, रुख्मिणी कांबळे आदींसह अन्य नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा पारूबाई तापकीर यांचा नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव व सर्व नगरसेवकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आळंदी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा पारूबाई तापकीर यांचा सत्कार करताना मान्यवर.

Web Title: Parubai Tapkir as the Deputy Mayor of Alandi