शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या वेदना पक्षनेतृत्वाने समजून घेण्याची गरज - दिलीप मोहिते-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 14:43 IST

-  कार्यकर्ता मेळाव्यात स्वपक्षालाच मोहिते-पाटलांचा घरचा आहेर

चाकण : खेड तालुक्यात एमआयडीसी, महामार्ग, रिंग रोड, रेल्वे प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबांची अवस्था बिकट झाली आहे. पक्षनेतृत्वाने त्यांच्या वेदना समजून घेण्याची गरज आहे; परंतु तसे होताना दिसत नाही. मात्र मी त्यांच्यासाठी कायम उभा राहणार आहे. तालुक्यातील जनता हीच माझी खरी मोठी ताकद आहे, असे वक्तव्य माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी स्वपक्षाला घरचा आहेर देत केले आहे.

चाकण ( ता. खेड ) येथे (दि. ३०) ला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मोहिते-पाटील बोलत होते. याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, सुरेखा मोहिते, कमल कड, कैलास सांडभोर, अनिलबाबा राक्षे, गणेश बोत्रे, अरुण चांभारे, विनायक घुमटकर, नवनाथ होले, नीलेश थिगळे, आशिष येळवंडे, राम गोरे, मोबीन काझी, आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहिते पाटील पुढे म्हणाले की, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी दिवसरात्र कष्ट केले, अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी चोवीस तास कायम उभा आहे. निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी माझी साथ कार्यकर्त्यांना मिळणारच. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देणार आहे. आयतांनी आमच्याकडे संधी नाही; तसेच ज्यांना दुसरीकडे जायचं आहे, त्यांनी खुशाल जावे. असल्या फितुरांची पक्षाला गरज नाही.

वीस वर्षे ज्यांच्याविरोधात काम केले त्यांचा प्रचार आम्हाला करावा लागल्याची खंत व्यक्त करत मोहिते-पाटील म्हणाले की, वीस वर्षे मंत्रिपदावर राहून पक्षासाठी काय केलं आहे सर्वांना माहीत आहे. माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नावे न घेता त्यांनी घणाघात केला.

चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर नगरपरिषदेसाठी भारतीय जनता पक्षासोबत युती करणार असल्याचे सांगत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी भाजपची तयारी असेल तर युती करू अन्यथा स्वबळावर लढणार असल्याचे मोहिते-पाटील यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Khed Farmers' Pain Needs Party Leaders' Understanding: Dilip Mohite-Patil

Web Summary : Dilip Mohite-Patil criticizes his party for neglecting farmers affected by development projects in Khed. He pledges support, highlighting their struggles due to land acquisition for MIDC, highways, and railways. He also mentioned alliances with BJP for upcoming elections.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड