महारक्तदान शिबिरात पोलीस अधीक्षकांसह तरुण मंडळांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:15 IST2021-09-16T04:15:07+5:302021-09-16T04:15:07+5:30
शिबिरात पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक ...

महारक्तदान शिबिरात पोलीस अधीक्षकांसह तरुण मंडळांचा सहभाग
शिबिरात पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी प्रथम रक्तदान करून सुरुवात केली. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्या संकल्पनेतून कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना रक्ताची कमतरता भासू नये, या संकल्पनेतून हे शिबिर घेण्यात आले. सामाजिक बांधिलकीचा उद्देश साध्य होण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे सहाकार्य घेऊन आदर्श गणेश उत्सव सन २०२१ साजरा करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याबाबत सुचित करण्यात आलेले होते.
बारामती व परिसरातील विविध सामाजिक संघटना, गणेश उत्सव मंडळे, युवा कार्यकर्ते, महिला मंडळ व कॉलेजचे युवा-युवती, तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी रक्तदान केले.