विद्यापीठाचा रँकिंगमध्ये सहभाग
By Admin | Updated: March 16, 2015 04:24 IST2015-03-16T04:24:54+5:302015-03-16T04:24:54+5:30
जागतिक विद्यापीठाच्या क्रमवारीत भारतातील विद्यापीठे मागे असल्याची चर्चा नेहमीच केली जाते. परंतु,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने टाईम्स रुटर्स संस्थेशी

विद्यापीठाचा रँकिंगमध्ये सहभाग
पुणे: जागतिक विद्यापीठाच्या क्रमवारीत भारतातील विद्यापीठे मागे असल्याची चर्चा नेहमीच केली जाते. परंतु,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने टाईम्स रुटर्स संस्थेशी संवाद साधला असून रँकिंगसाठी आवश्यक असलेली माहिती जमा करण्याची प्रकिया विद्यापीठाने सुरू केली आहे. त्यामुळे सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ जागतिक क्रमवारीत नेमके कुठे आहे,याबाबतची खरी माहिती समोर येणार आहे.
जगातील विविध विद्यापीठांंची माहिती जमा करून टाईम्स रुटर्स सारख्या काही संस्था भारतासह विविध देशातील विद्यापीठांची जागतिक क्रमवारी जाहीर करतात. परंतु,विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे ही रँकिंग प्रसिध्द केली जाते.वस्तूस्थिती विचार न घेता रँकिंग जाहीर केले जाते.
त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने रँकिंग जाहीर करणा-या टाईम्स रुटर्स संस्थेशी संपर्क साधला.आता विद्यापीठाने दिलेल्या माहितीची पडताळणी करून टाईम्स रुटर्सतर्फे खरी रँकिंग प्रसिध्द केली जाणार आहे.
गेल्या काही वर्षात शैक्षणिक दर्जा, संशोधनाचा दर्जा, पायाभूत सुविधांचा विकास आदी क्षेत्रात प्रगती केली आहे. त्याच प्रमाणे काही परदेशी विद्यापीठांशी करार केले आहेत. त्याच प्रमाणे काही विद्यापीठांच्या शिष्टमंडळाने विविध विद्यापीठांना भेटी दिल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून जर्मनितील गोटिंजन विद्यापीठाने करार करून एका जॉईंट प्रोजेक्ट अंतर्गत ४ कोटी रुपयांचे अनुदान मान्य केले आहे. विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजीव सोनवणे व त्यांच्या सहका-यांना या संदर्भातील प्रस्ताव सादर केला होता,असे विविध उपक्रम विद्यापीठाच्या रँकिंग वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी अधिसभेत रँकिंगच्या प्रक्रियेत सहभागी होण्याबाबत माहिती दिली.त्याच प्रमाणे विद्यापीठाच्या सुदर परिसर पाहून इंजिनिअरिंग वॉच मॅगझीने विद्यापीठाला पुरस्कार जाहीर केला आहे,अशी माहितीही अधिसभेत सांगितली. (प्रतिनिधी)