शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहर आणि परिसरातील मॉल-मल्टिप्लेक्समधील पार्किंग आता फुकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 21:05 IST

न्यायालयाच्या निर्णयानुसार मॉल, मल्टिप्लेक्समध्ये येणा-या ग्राहकांना पार्किंग शुल्क आकारणे बेकायदेशीर आहे.

ठळक मुद्देशहर सुधारणा समितीच्या बैठकीत ठरावबहुतेक सर्व मॉल, मल्टिप्लेक्समध्ये ग्राहकांची लुट केली जात असून, ५ रुपयांपासून ५०, १०० रुपयांपर्यंत पार्किंग शुल्क

पुणे: शहर आणि परिसरातील एकाही मॉल, मल्टिप्लेक्समध्ये येणा-या ग्राहकांना यापुढे कोणत्याही स्वरुपाचे पार्किंग शुल्क आकारण्यात येऊ नये, असा ठराव शुक्रवारी महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत करण्यात आला. बेकायदेशीरपणे नागरिकांकडून पार्किंग शुल्क वसूल करणा-या सर्व मॉल, मल्टिप्लेक्सला दोन दिवसांत नोटीसा देण्याचे आदेश देखील शहर सुधारणा समितीच्या बैठकीत प्रशासनाला देण्यात आले. न्यायालयाच्या निर्णयानुसार मॉल, मल्टिप्लेक्समध्ये येणा-या ग्राहकांना पार्किंग शुल्क आकारणे बेकायदेशीर आहे. परंतु पुणे शहर आणि परिसरातील बहुतेक सर्व मॉल, मल्टिप्लेक्समध्ये ग्राहकांची लुट केली जात असून, ५ रुपयांपासून ५० रुपये, १०० रुपयांपर्यंत पार्किंग शुल्क आकारणी केली जात आहे. मॉल, मल्टिप्लेक्समध्ये येणा-या ग्राहकांना मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित व्यावस्थापकांची असते. याबाबत न्यायालयाने वेळोवेळी निर्णय दिला आहे. त्यानंतर देखील शहरातील मॉल, मल्टिप्लेक्सकडून अनधिकृतपणे पार्किंग शुल्क वसुल केले जात आहे. याबाबत महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यामध्ये समितीने शहरातील मॉलची संख्या व आकारण्यात येणा-या पार्किंग शुल्काची माहिती प्रशासनाकडे मागविली होती. यामध्ये महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शहर आणि परिसरामध्ये ४० हून अधिक मॉल आणि मल्टिप्लेक्स असून, यामध्ये ५ रुपयांपासून १० रुपये, ५० रुपये थेट १०० रुपयांपर्यंत पार्किंग शुल्क आकारण्यात येत असल्याची माहिती शुक्रवारी झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत सादर करण्यात आली. यामुळे या बैठकीमध्ये नागरिकांकडून बेकायदेशीर पणे पार्किंग शुल्क आकारणी करणा-या मॉल, मल्टिप्लेक्सच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा व संबंधित सर्वांना तातडीने नोटीसा देण्याचा निर्णय घेण्यात आला.--------------------नागरिकांची लूट थांबविण्यासाठी प्रयत्न करणारशहरातील मॉल, मल्टिप्लेक्सकडून नागरिकांकडून बेकायदेशीरपणे पार्किंग शुल्क वसूल केले जात आहे. याबाबत शहर सुधारण समितीत प्रचंड विरोध करण्यात आला असून, नागरिकांची होणारी पिळवणूक थांबविण्याची मागणी सर्व सदस्यांनी केली. त्यानुसार समितीच्या बैठकीत सर्व मॉल, मल्टिप्लेक्सने तातडीने पार्किंग शुल्क आकारणी बंद करण्याचा व संबंधिता नोटीसा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी समितीच्या वतीने प्रयत्न करणार आहोत.-अमोल बालवडकर, शहर सुधारणा समिती अध्यक्ष

  

टॅग्स :PuneपुणेParkingपार्किंग