शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘नो पार्किंग'मध्येच होतेय पार्किंग : फलक उरले नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 11:44 IST

पंचतारांकित हॉटेल व आयटी पार्कची सर्व चारचाकी वाहने, दुचाकी या रस्त्यावर उभी केली जातात.

ठळक मुद्देनगर रस्त्यावर विमानतळ वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष 

चंदननगर : नगर रस्त्यावर मंत्री मार्केट येथील रस्त्यावर वारंवार वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत, तरी देखील पार्किंग केले जात आहे. याकडे पोलीस मात्र दुर्लक्ष करीत आहेत. आजूबाजूच्या परिसरात पंचतारांकित हॉटेल व आयटी पार्कची सर्व  चारचाकी वाहने, दुचाकी या रस्त्यावर उभी केली जातात. या ठिकाणी दिवसभर रस्त्यात व पादचाऱ्यांना अडथळा ठरेल अशा पद्धतीने वाहने लावली जातात. या ठिकाणी पदपथाची  वाहनचालकांकडून स्वच्छता केली जाते. तसेच कशीही वाकडी-तिकडी वाहने उभी केल्यामुळे परिणामी वाहतूककोंडी होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.  'नो पार्किंग'चे फलक नसल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाई करताना अडचणी  येत होत्या; मात्र त्यानंतर या ठिकाणी 'नो पार्किंग' करण्यात आली असून, तरीदेखील या ठिकाणी 'नो पार्किंग' करूनही काहीच फरक पडलेला नाही.  याउलट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्रास वाहने उभी केली जात असून, पूर्वीपेक्षा अधिक वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले आहे.  ......तक्रार करणाऱ्यालाच वाहतूक पोलिसांनी केले टार्गेटयाबाबत मोठ्या प्रमाणात नो पार्किंगमध्ये पार्किंग केली जात असल्याची तक्रार श्रीधर गलांडे यांनी केली असता वाहतूक पोलिसांनी त्यांच्याच गाडीला जॅमर लावून त्यांच्याकडून दोन हजार रुपये वसूल केले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नो-पार्किंगमध्ये बेकायदेशीर पार्किंग चांदरे कॉम्प्लेक्स ते टाटा गार्डरूम दरम्यान होत असल्याची तक्रार श्रीधर गलांडे यांनी पुणे ट्रॅफिककडे ऑनलाइन केली होती. ........नगर रस्त्यावर चांदरे कॉम्प्लेक्स ते टाटा गार्डरूम दरम्यान हा भाग नो पार्किंग झोन असूनदेखील या ठिकाणी आणि बेकायदेशीर नो पार्किंगमध्ये पार्किंग केली जात असल्याची तक्रार मी पुणे वाहतूक पोलिसांकडे केली म्हणून विमानतळ वाहतूक पोलिसांनी मला टार्गेट करून माझ्या गाडीला जॅमर लावून दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला. - श्रीधर ज्ञानेश्वर गलांडे 

श्रीधर गलांडे यांनी नगर रस्त्यावर मंत्री मार्केटसमोर त्यांची कार  वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने भर रस्त्यात उभी केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहतूककोंडी होत  असल्याने त्यांच्या कारला जॅमर लावून त्यांच्यावर दंड आकारून कारवाई केली .- जितेंद्र कोळी, वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक, लोहगाव विमानतळ विभाग..........

टॅग्स :PuneपुणेChandan NagarचंदननगरParkingपार्किंगtraffic policeवाहतूक पोलीस