पतंगराव कदम जयंतीनिमित्त परिवर्तनवादी साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST2021-01-08T04:26:18+5:302021-01-08T04:26:18+5:30
पुणे : जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठानच्या वतीने ८ आणि ९ जानेवारीला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह येथे परिवर्तनवादी साहित्य संमेलन ...

पतंगराव कदम जयंतीनिमित्त परिवर्तनवादी साहित्य संमेलन
पुणे : जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठानच्या वतीने ८ आणि ९ जानेवारीला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह येथे परिवर्तनवादी साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धिवार म्हणाले की, दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन ८ जानेवारीला सकाळी ११ वाजता राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते होणार आहे. राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, सहकार कृषी आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार चंद्रकांत पाटील, चेतन तुपे, माधुरी मिसाळ, महापौर मुरलीधर मोहोळ आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
चौकट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन साहित्य संमेलन पुरस्कार पद्मविभूषण डॉ. शा. ब. मुजुमदार यांच्या हस्ते डॉ. बाबा आढाव, मिलिंद काळे, गणपतराव देशमुख, प्रा. रणजित दिसले, सुनील चव्हाण, अरुण छाब्रिया यांना प्रदान करण्यात येणार आहे.