शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात नर्सरीतील प्रवेशासाठी पालकांनी जागून काढली रात्र    

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 02:34 IST

आपल्या पाल्याला नर्सरीत प्रवेश मिळविण्यासाठी पालकांनी संपूर्ण रात्र जागून काढण्याची तयारी पुण्यात केली आहे. शनिवारी रात्री तब्बल 300 हून अधिक पालक स्पायसर शाळेच्या बाहेर फुटपाथवर बसून होते. एप्रिल महिन्यापासूनच शाळांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत.

- निनाद देशमुख          

 पुणे : आपल्या पाल्याला नर्सरीत प्रवेश मिळविण्यासाठी पालकांनी संपूर्ण रात्र जागून काढण्याची तयारी पुण्यात केली आहे. शनिवारी रात्री तब्बल 300 हून अधिक पालक स्पायसर शाळेच्या बाहेर फुटपाथवर बसून होते.

एप्रिल महिन्यापासूनच शाळांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळ असलेल्या स्पायसर शाळेत उद्या प्रवेश अर्ज मिळणार आहेत. या परिसरातील ही एक प्रतिष्टीत शाळा मानली जाते. त्यामुळे या शाळेत प्रवेश मिळण्यासाठी पालकांची नेहमीच झुंबड उडते. मात्र प्रवेश मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वाने अर्ज दिले जातात. त्यामुळे या शाळेचा प्रवेश अर्ज मिळविणेही एक दिव्य असते. शनिवारी रात्री तब्बल 300 हून अधिक पालकांनी हे दिव्य केले.  केवळ रविवारी सकाळी आठ वाजताच अर्ज मिळणार असल्याने शनिवारी सायंकाळी सात वाजल्यापासूनच पालक प्रवेशासाठीच्या रांगेत लागले होते.

विशेष म्हणजे शाळेच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर पालकांनीच स्वयंस्फूर्तीने ही रांग लावली होती. शाळा प्रशासनाकडून याबत कोणतीही सूचना नव्हती किंवा व्यवस्थाही करण्यात आली नव्हती. संपूर्ण रात्र जागून काढण्याच्या तयारीनेच पालक आले होते. रात्र होऊ लागली तशी ही संख्या वाढू लागली. मध्यरात्री एक वाजता सुमारे 300 पालक शाळेबाहेरच्या फुटपाथवर रांगेत लागले होते. रांगेची शिस्त स्वतःहून पाळली जात होती. बहुतेकांनी अंथरूण पांघरूण आणले होते. काही जण तर मच्छर अगरबत्ती लावून बसले होते. अनेकांना घरच्या इतर लोकांनी रात्री जेवण आणून दिले होते. मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि पालक रात्रभर थांबणार असल्याचे माहित असल्याने एक चहाची गाडीही येथे आली होती. आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळविण्याचा प्रत्येकच पालकांचा प्रयत्न असतो.

पुण्यात शासकीय अनुदानित असलेल्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या शाळा आहेत. जुन्या शाळांचे शुल्क तुलनेने खूपच कमी आहे. त्यामुळे या शाळांना पालक प्राधान्य देतात. दर वर्षी प्रवेशाच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पालक रात्रभर रांगेत असतात, असे एका पालकाने सांगितले.

टॅग्स :Puneपुणे