शुल्कवाढीविरोधात पालकांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:15 IST2021-02-17T04:15:55+5:302021-02-17T04:15:55+5:30
वडगावशेरीतील विद्यांकुर शाळा प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून शुल्क भरण्यासाठी तगादा लावल्याने गेल्या महिन्याभरापासून विद्यार्थ्यांचे पालक व मनसेच्या वतीने सातत्याने ...

शुल्कवाढीविरोधात पालकांचे ठिय्या आंदोलन
वडगावशेरीतील विद्यांकुर शाळा प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून शुल्क भरण्यासाठी तगादा लावल्याने गेल्या महिन्याभरापासून विद्यार्थ्यांचे पालक व मनसेच्या वतीने सातत्याने आंदोलन करूनही शाळा वार्षिक शुल्कासाठी तगादा लावत आहे.
कोरोनामुळे शाळा बंद आहे. केवळ ऑनलाईन वर्ग सुरू असल्याने शाळेमध्ये असणाऱ्या इतर सोयी सुविधा विद्यार्थ्यांना मिळाल्या नाही. यावर्षी विद्यार्थ्यांचे ५० टक्के शुल्क माफ करावे, अशी मागणी गेल्या चार महिन्यांपासून शाळेतील विद्यार्थिनींचे पालक करत आहेत. मात्र शाळा प्रशासन पालकांच्या आंदोलनाला कसलाही प्रतिसाद देत नसल्याने विद्यार्थ्यांचे पालक त्रस्त झाले आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांचे धंदे बंद पडल्याने पालकांना शुल्क भरायला अवघड जात असल्याने पालकांच्या वतीने शाळेला सातत्याने ५० टक्के शुल्क माफ करावी, अशी मागणी होत असताना शाळेने केवळ अडीच हजार रुपये माफ करून इतर फी भरण्याच्या सूचना पालकांना दिल्या आहेत.
या वेळी इरशात खान, मनसेचे अरुण येवले,अच्युतराव मोळावडे, गणेश पाटील, कुलदीप घोडके, रियाज शेख यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
-------
कोरोनामुळे शाळा बंद असताना केवळ ऑनलाईन क्लासेस घेऊन शाळा पालकांकडून पूर्ण वार्षिक फीसाठी तगादा लावत आहे. कोरोनामुळे प्रत्येकावर आार्थिक संकट असल्याचे शाळेने भान ठेवावे, अन्यथा याहून अधिक तीव्र आंदोलन केले जाईल.
-अरूण येवले,उपाध्यक्ष मनसे पुणे शहर
--------
शाळा प्रशासनाला भेटून कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे पालकांना अर्थिक संकटात असल्याने वार्षिक फीबाबत शाळेने पालकांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याच्या सूचना प्राचार्य व फादर यांना दिल्या आहेत.
-एम. आर. जाधव, सहायक शिक्षणप्रमुख
===Photopath===
160221\16pun_14_16022021_6.jpg
===Caption===
वडगावशेरीतील वर्षिक फि साठी तगादा लावणार्या विद्यांकुर शाळेच्या गेटवर मनसे व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीने ठिय्या आंदोलन करताना.