मुलांवर पालकांनी विश्वास ठेवण्याची गरज

By Admin | Updated: January 14, 2017 02:44 IST2017-01-14T02:44:52+5:302017-01-14T02:44:52+5:30

तुम्ही मुलांवर फक्त प्रेम करा,मुले तुमच्याशी मैत्री करतील. तुम्ही मुलांवर विश्वास टाका,मुले तुम्हाला त्यांच्यासोबत मोठं करतील

Parents need to believe in children | मुलांवर पालकांनी विश्वास ठेवण्याची गरज

मुलांवर पालकांनी विश्वास ठेवण्याची गरज

पिंपरी : तुम्ही मुलांवर फक्त प्रेम करा,मुले तुमच्याशी मैत्री करतील. तुम्ही मुलांवर विश्वास टाका,मुले तुम्हाला त्यांच्यासोबत मोठं करतील, असे मत बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी व्यक्त केले. ते थेरगाव येथील प्रेरणा शिक्षण संस्था आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम गुजर होते. याप्रसंगी संस्थेचे मानद सचिव कांतीलाल गुजर, संस्थेच्या विश्वस्त शालिनी गुजर, कार्याध्यक्ष अंकुश पऱ्हाड, संस्थेचे प्रशासन अधिकारी विलास दसाडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, प्राचार्य यशवंत पवार, मुख्याध्यापक कैलास पवळे, पद्मिनी वराडे, राजकुमार सरोदे,महेंद्र पवार आदि मान्यवर उपस्थित होते.
तांबे म्हणाले, ‘‘ मुलांना विशिष्ट प्रकारची विशेषणे (लेबले) लावू नका. काय करू नका यापेक्षा काय करा ते सांगा. पालक आणि मुले यांच्यात दरी निर्माण होण्यास प्रमुख कारण म्हणजे पालक मुलांशी थेट बोलत नाहीत.मुलांशी थेट बोला.मुलांच्या बाबतीत तुम्हाला काय आवडते आणि काय नाही याची त्यांना स्पष्टपणे कल्पना दया. त्यावर त्यांना आपले मत मोकळेपणाने मांडण्याची संधी द्या.’’ कांतिलाल गुजर यांनी मनोगत व्यक्त केले. नाना शिवले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
दत्ता उबाळे यांनी सूत्रसंचालन केले. यशवंत पवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Parents need to believe in children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.