आॅनलाईन अर्ज भरण्यास पालकांची गर्दी
By Admin | Updated: March 14, 2015 06:17 IST2015-03-14T06:17:22+5:302015-03-14T06:17:22+5:30
शिक्षणहक्क कायदा २००९ अंतर्गत अल्पसंख्याक, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, पारशी, इतर मागास, भटक्या विमुक्त जाती-जमाती यांना शाळा प्रवेशासाठी २५ टक्के आरक्षण आ

आॅनलाईन अर्ज भरण्यास पालकांची गर्दी
पिंपरी : शिक्षणहक्क कायदा २००९ अंतर्गत अल्पसंख्याक, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, पारशी, इतर मागास, भटक्या विमुक्त जाती-जमाती यांना शाळा प्रवेशासाठी २५ टक्के आरक्षण आहे. आकुर्डी येथे नगरसेवक जावेद शेख यांनी या आरक्षणांतर्गत प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुरू केलेल्या खासगी केंद्रावर अर्ज भरण्यास पालकांची गर्दी होत आहे.
योग्य नियोजन व केंद्राकडून योग्य मार्गदर्शन केले जात आहे. केंद्रावर स्वागत कक्ष, प्राथमिक माहिती, कागदपत्रे पडताळणी, मूळ दाखल्यांचे स्कॅनिंग व आॅनलाईन अर्ज भरणे अशा प्रकारे काम सुरू आहे. एकूण ११ संगणक व ३ स्कॅनिंग मशिनवर पालकांकडून अर्ज भरले जात आहेत. हे प्रवेश अर्ज भरून देण्यासाठी आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघातील २२ ज्येष्ठ नागरिक यामध्ये सहभागी होऊन मदत करत आहेत.
शिबिराला सुमारे दोन हजार पालकांनी भेट दिली आहे. त्यामध्ये १ हजार ९५ पालकांनी अर्ज भरले आहेत. उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी पालकांना अडचणी येत आहेत. त्याविषयीही मार्गदर्शन केले जात आहे. (वा. प्र.)