शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

बुद्ध्यांक कमी असल्याचे सांगून मुलीला शाळेतून काढल्याची पालकांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 03:33 IST

आरटीईअंतर्गत गेली ६ वर्षे येथील एका शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्र्थिनीला शाळेने काही येत नसल्याचे कारण सांगून काढून टाकल्याची तक्रार पालकांनी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व चाकण पोलीस ठाण्यात केली आहे.

महाळुंगे : आरटीईअंतर्गत गेली ६ वर्षे येथील एका शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्र्थिनीला शाळेने काही येत नसल्याचे कारण सांगून काढून टाकल्याची तक्रार पालकांनी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व चाकण पोलीस ठाण्यात केली आहे. या संदर्भात शाळेने मात्र सदर विद्यार्थिनीला शाळेतून काढले नसून तिचा बुद्ध्यंक इतर मुलांपेक्षा कमी असल्याने पालकांना मराठी शाळेत प्रवेश घेण्याचा सल्ला दिल्याचे स्पष्ट केले आहे.या संदर्भात अधिक माहिती अशी : यशस्वी अंकुश भोसले ही विद्यार्थिनी बाल शिक्षण हक्कअंतर्गत ६ वर्षांपासून द्वारका स्कूल महाळुंगे येथे शिक्षण घेत आहे. ती इयत्ता चौथीत शिकते.पालकांनी या संदर्भात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की माझ्या मुलीला शाळेतून काढण्यात आले आहे. शाळेच्या या निर्णयामुळे माझ्या मुलीची वेळ आणि वर्ष वाया जाणार आहे. तिच्यावर घरी राहण्याची नामुष्की ओढवली आहे. तिला दुसऱ्या खासगी शाळेत प्रवेश घेणे कसोटीचे आहे. शाळेने या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे मला व माझ्या मुलीला मानसिक धक्का बसला आहे. माझ्या मुलीला काही येत नाही, हे शाळेला तब्बल ६ वर्षांनी कळले का? असा सवालही करण्यात आला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून शिक्षण द्यायचे सोडून विचित्र वागणूक देत आहेत.या संदर्भात शाळा प्रशासनाने सांगितले, की तिला विशेष शिक्षक देऊन शिकवणी घेत आहोत. विद्यार्थिनीला इंग्लिश अभ्यासक्रम समजण्यास त्रास होतो. तिला एक प्रकारचा मानसिक तणाव येतो. त्यामुळे पालकांना आम्ही वारंवार ३ वर्षांपासून सूचना करूनही त्यांनी मुलीची बुद्धिमत्ता चाचणी केली नाही. यावर शाळने विनंती करून तिला जबरदस्तीने पालकांच्या सोबत पाठविले व आयक्यू तपासणीसाठी पैसे देऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये तपासणी केली. तपासणी अहवालानुसार पालकांना सांगितले, की तिला या अभ्यासक्रमाचा ताण येतो. तिची अभ्यासामध्ये सुधारणा करायची असेल, तर तिला समजणाºया मराठी शाळेत तुम्ही तिला टाका. आम्ही शिकवायला तयार आहोत; परंतु तिचे नुकसान नको! आपल्याला समजल्यावर वेळ निघून गेलेली असेल तरीदेखील पालक हे ऐकत नसून शाळेविरोधात चुकीची तक्रार करीत आहेत. शाळेने त्या मुलीला शाळेतून काढले नाही, असे मुख्याध्यापकांनी सांगितले.माझ्या मुलीला शाळेला बालशिक्षण हक्कानुसार मोफत शिक्षण द्यायचे नाही; त्यामुळे शाळा खोटारडे आरोप करून दुसºया शाळेत शिक्षण घ्यायला सांगत आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे मी गप्प बसणार नाही. शिक्षणमंत्र्यांकडे धाव घेणार आहे.-अंकुश भोसले, विद्यार्थिनीचे वडीलशाळेने यशस्वीला काढून टाकले नाही. ती शाळा चालू झाल्यापासून शाळेत येत नाही. तिचे नाव हजेरी पुस्तकावर आहे; पण आम्ही पालकांना योग्य सल्ला दिला होता. ते समजून घेत नाहीत. आम्ही ६४ मुले बालशिक्षण हक्कातून शिकवत आहोत. एका विद्यार्थ्याने आम्हाला काहीच अडचण नाही. या वर्षी आरटीईमधून मुले कमी होती, तर आम्ही पंचायत समितीकडून नवीन प्रवेश घेतले आहेत.- स्वाती आंबरे, मुख्याध्यापिका द्वारका स्कूल

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र