फीवाढीच्या निषेधार्थ पालकांचे आंदोलन
By Admin | Updated: March 15, 2015 00:37 IST2015-03-15T00:37:49+5:302015-03-15T00:37:49+5:30
मगरपट्टा व एनआयबीएम, बालीवाडी येथील विभग्योर स्कूलमधील शैक्षणिक फीवाढीच्या निषेधार्थ आज मगरपट्टा येथील स्कूलसमोर पालकांनी आंदोलन केले.

फीवाढीच्या निषेधार्थ पालकांचे आंदोलन
हडपसर : मगरपट्टा व एनआयबीएम, बालीवाडी येथील विभग्योर स्कूलमधील शैक्षणिक फीवाढीच्या निषेधार्थ आज मगरपट्टा येथील स्कूलसमोर पालकांनी आंदोलन केले. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार या स्कूलची फीवाढ होत नसून, दर वर्षी १२ ते १५ टक्क्यांनी वाढ केली जात आहे. त्याचप्रमाणे वर्षभर प्रवेश या तिन्ही शाळेत दिले जात आहेत. त्याचप्रमाणे सुमारे ४० हजार रुपयांचे डोनेशन घेण्यात येत आहे.
अशा प्रकारे पालकांची लूट हे स्कूल करीत असल्याने पुण्यातील तिन्ही शाळांच्या पालकांच्या वतीने सोमवारी एनआयबीएम येथील स्कूलसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे पालकांनी या वेळी सांगितले.
मगरपट्टा येथील विभग्योर स्कूलसमोर आज या शाळेतील पालकांनी फीवाढीच्या निषेधार्थ आंदोलन केले. त्याचप्रमाणे प्राचार्यांनी राजीनामा दिला. तरी दुसऱ्या प्राचार्यांची नियुक्ती करण्यात आली नाही.
पालक समितीमध्ये फीवाढीबाबत सुमारे ६ महिने आधी चर्चा होणे गरजेचे आहे; परंतु ती केली गेली नाही. एकदा फीवाढ झाली, की दोन वर्षे फीवाढ करता येत नाही, हा शासनाचा नियम आहे. परंतु, शासनाच्या नियमाचे उल्लघंन करण्यात येत असल्याने आज आंदोलन करण्यात आले.
पुण्यात बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभर कधीही प्रवेश दिला जातो. त्याचप्रमाणे भरमसाट डिपोझिट घेण्यात येते. (वार्ताहर)