शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

फीवाढीविरोधात पालकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 02:58 IST

जेएसपीएम व सिग्नेट स्कूल; नियमबाह्य फीवाढ, गुणवत्ताधारक शिक्षकांची वानवा

हडपसर : जेएसपीएम संस्थेच्या जेएसपीएम व सिग्नेट स्कूलच्या पालकांनी फीवाढ रद्द व्हावी, यासाठी शुक्रवारी सकाळी आंदोलन केले. सीबीएसई पॅटर्ननुसार शिक्षकभरती नाही, तसेच त्याचप्रमाणे गुणवत्ता दिसून येत नसल्याची तक्रार पालकांनी योगेश ससाणे यांच्या नेतृत्वाखाली केले. यावेळी शाळा व्यवस्थापन व पालक यांची कमिटी तयार करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन शाळा व्यवस्थापन दिले आहे.हांडेवाडी रोड येथे जेएसपीएम संस्थेच्या जेएसपीएम ही सीबीएसई बोर्डनुसार शाळा आहे, तर सिग्नेट स्कूल ही एसएससी बोर्डच्या अभ्यासक्रमाची शाळा आहे. यावर्षी शाळेने मागील दोन वर्षांपासून नियमबाह्य फीवाढ केली आहे. तसेच स्टेशनरी, गणवेश, वह्यापुस्तके व इतर अनेक कारणास्तव फी आकारली जात आहे, तसेच शाळेमधील काही शिक्षक हे गुणवत्ता पूर्ण नाहीत. याबाबत पालकांनी वारंवार शाळा व व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र पालकाच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे पालकांनी शिक्षण उपसंचालकाकडे तक्रार केली होती. याबाबत त्यानुसार शिक्षण उपसंचालकाने दखल घेऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत कसली फीसक्ती व वसुली करू नये, असा आदेश काढला होता. तरीसुद्धा शाळा प्रशासनाने शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यामार्फत फी मागणीचा रेटा लावून धरला. त्यामुळे नगरसेवक योगेश ससाणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी दोनशे पालकांनी आंदोलन केले. यावेळी पालक प्रतिनिधी वर्षा निघोज, शाहिस्ता बेग, योगेश भोसले, सुदाम शेवाळे, अजय नाईक, मनीषा शेलार, दत्ता हरपळे, संदीप जगताप, मोहन मोडक आदी उपस्थित होते. यावेळी संचालक वसंत बुगडे यांनी सांगितले, आम्ही वाढीव फी घेतली नाही.आम्ही जी फी घेत आहोत ती जुन्या पद्धतीनेच फी भरण्याचे सांगत आहे. तसेच शासनाच्या नियमानुसार उच्चशिक्षित शिक्षकांची नेमणूक केली आहे. याबाबत पालकांनी गैरसमज करून घेऊ नये. याबाबत पालकांना काही शंका असल्यास त्यांनी शाळेत येऊन भेटावे.उपसंचालकांची स्थगिती जुमानली नाही...पालक अजय नाईक म्हणाले, की शाळेने नियमबाह्य फी वाढवली आहे. फी भरण्याबाबत शासनाने स्थगिती दिली आहे, याबाबत वाढीव फी भरली नाही की विद्यार्थ्याद्वारे पालकांना रोज दबाव आणला जात आहे. सी. बी. सी. पॅटर्न आहे. मग येथील काही शिक्षकांना इंग्लिश बोलता येत नाही.नगरसेवक योगेश ससाणे यांनी सांगितले, की पालकांकडून बेकायदा फी वसूल केली जात आहे. याबाबत पालकासोबत आम्ही शिक्षण उपसंचालकाकडे तक्रार नोंदवली आहे. उपसंचालकाने फी घेण्यास स्थगिती दिली, तरी शाळा प्रशासन फी विद्यार्थ्यांवर दबाव टाकून वसूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणStudentविद्यार्थी