सुपे दक्षता समितीच्या अध्यक्षपदी पानसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST2021-06-22T04:08:43+5:302021-06-22T04:08:43+5:30

जिल्ह्याचे पालकमंत्री सुचवतील त्यानुसार या समितीची निवड करण्यात येते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १३ जणांची समिती स्थापन करण्यात आली. त्यानुसार दक्षता ...

Pansare as the Chairman of the Supe Vigilance Committee | सुपे दक्षता समितीच्या अध्यक्षपदी पानसरे

सुपे दक्षता समितीच्या अध्यक्षपदी पानसरे

जिल्ह्याचे पालकमंत्री सुचवतील त्यानुसार या समितीची निवड करण्यात येते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १३ जणांची समिती स्थापन करण्यात आली. त्यानुसार दक्षता समितीच्या अध्यक्षपदी पंचायत समितीचे माजी सभापती पोपट पानसरे यांची निवड करण्यात आली. तर सचिवपदी येथील तहसीलदार यांची निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये विधान परिषद सदस्यसह अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष, तर

पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी हे सदस्य यांच्यासह तीन महिला सदस्य, तर दोन विरोधी सदस्य तर जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले शिधावाटप दुकानदार प्रतिनिधी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती एक एक प्रतिनिधी तर अण्णा हजारे सुचवतील असे एक प्रतिनिधी आदी १३ जणांची दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे.

Web Title: Pansare as the Chairman of the Supe Vigilance Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.