शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नीरा नदीपात्रात मंगुर माशाची दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 23:23 IST

मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न : इतर चवीष्ट माशांची उपलब्धता घटली

निमसाखर : येथील नीरा नदीपात्रामध्ये मंगुर जातीचा मासा सापडू लागला आहे, अशी माहिती मच्छीमारांनी दिली. मंगुर मासा इतर माशांना नष्ट करतो. बाजारात मंगुर मासा ग्राहक खरेदी करीत नाहीत. परिणामी मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. उजनीपाठोपाठ नीरा नदीपात्रातदेखील मंगुरची दहशत पसरली आहे.

निमसाखर (ता. इंदापूर) येथील व पळसमंडळनजीकच्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्यात अनेक तरुण मासेमारी करून आपली उपजीविका करीत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून नीरा नदीत मंगुर जातीचे मासे सापडत असल्यामुळे मरळ, तिलापी, रहु वामसह अन्य चवीष्ट माशांना निमसाखरकरांना मुकावे लागणार आहे. गावापासून सुमारे दोन किलोमीटरवर पळसमंडळ (माळशिरस) जवळ कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. सध्या नदीमध्ये पाणी असल्याने या भागातील तरुणांना मासेमारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. यापूर्वी या भागातील तरुण मासेमारी करीत असताना अठरा ते वीस किलोपर्यंतचे मासे या नीरा नदीमध्ये सापडले आहेत.नदीत यापूर्वी रहू, कानस, तिलापी, खेकडे, वाम, मरळसह अन्य प्रकारचे मासे सापडत असल्याचे या भागातील मच्छीमारांनी सांगितले. यंदा मात्र नीरा नदी काही दिवसच वाहिल्याने मासे कमी प्रमाणत मिळत आहेत. यातूनही काही प्रमाणात मासे सापडत आहेत. मात्र सगळ्यात जास्त बंदी असलेला मंगुर जातीचा मासा सापडत आहे. हा मंगुर जातीचा मासा आरोग्यासाठी त्रासदायक, घातक असल्यामुळे नागरिक हा मासा विकत घेत नाहीत. याचबरोबर हा मासा इतर माशांना गिळंकृत करत असल्यामुळे इतर जातीचे मासे मिळणे दुरापास्त झाले आहे. ज्याप्रमाणे बंदी असलेल्या मंगुर जातीचा मासा उजनी धरणात अथवा भिगवण भागातील तळ्यांमध्ये सापडतो. याप्रमाणे हा मासा नीरा नदीतही सापडत असल्यामुळे या माशाची दहशत आता नीरा नदीतही जाणवू लागली आहे. यामुळे ग्रामीण भागातील मत्स्यव्यवसाय करणारे मच्छीमार मासे मिळत नसल्याने हवालदिल झाले आहेत. यामुळे बेरोजगारीची कुºहाड या तरुणांवर पडली तर आहेच; परंतु या भागातील खवय्येसुद्धा चांगलेच धास्तावले असल्याची या परिसरातून चर्चा आहे.मंगुर जातीचा मासा आरोग्यासाठी त्रासदायक असल्यामुळे नागरिकांकडून मागणी नसते.मंगुर मासा इतर माशांना गिळंकृत करीत असल्यामुळे इतर जातीचे मासे मिळणे दुरापास्तउजनी धरण किंवा भिगवण भागातील तळ्यांबरोबरच नीरा नदीतही आढळामुळे समस्येत वाढ

टॅग्स :neera bhima projectनिरा भीमा नदीजोड प्रकल्पPuneपुणेFishermanमच्छीमार