शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

झुणका-भाकर केंद्रामध्ये आता मिळणार मटार-पनीरही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 14:46 IST

मागील अनेक वर्षांपासून पुण्याची ओळख म्हणून असलेल्या झुणका-भाकर केंद्रात आता मटार-पनीरसारख्या पंजाबी भाज्या आणि रोट्याही मिळणार आहेत...

ठळक मुद्देअखिल मंडई मंडळाकडून श्रमिका, कष्टकरीवर्गाला स्वस्त दरात जेवण मिळावे, म्हणून हे केंद्र सुरू

पुणे : मागील अनेक वर्षांपासून पुण्याची ओळख म्हणून असलेल्या झुणका-भाकर केंद्रात आता मटार-पनीरसारख्या पंजाबी भाज्या आणि रोट्याही मिळणार आहेत. मेट्रोच्या कामामुळे मंडईतील या केंद्राची स्थलांतर करण्यात येत असून सन १९७२ पासून या जागेत सुरू झालेला झुणका-भाकर आणि ठेच्याचा ठसका शनिवारी थांबला. मंडई येथीलच वाहनतळाच्या जागेत हे केंद्र तात्पुरते म्हणून हलवण्यात आले असून तिथे नवे पदार्थही देण्यात येणार आहेत.महापालिकेच्या जागेत अखिल मंडई मंडळाकडून श्रमिका, कष्टकरीवर्गाला स्वस्त दरात जेवण मिळावे, म्हणून हे केंद्र सुरू करण्यात आले. मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष अप्पा थोरात यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वाढदिवशी त्यांना भेट म्हणून केंद्र सुरू केले. त्यावेळी दुष्काळ पडला होता व कष्टकरी जनतेची उपासमार होऊ नये, असा उद्देश त्यामागे होता. तेव्हापासून अखंडपणे सुरू असलेल्या या केंद्रातील चुलीवर शनिवारी अखेरच्या भाकºया तयार केल्या गेल्या. त्यासाठी केंद्र सुरू झाले तेव्हापासून तिथे जेवणासाठी म्हणून येत असलेल्या माऊली या मंडईतीलच श्रमिकाला खास बोलावण्यात आले होते. त्यांच्याबरोबरच आनंद सराफ, अ‍ॅड. मंदार जोशी, मेट्रोचे भूसंपादन अधिकारी भिवाजी पराड तसेच मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अण्णा थोरात म्हणाले, की मेट्रोचे भूमिगत स्थानक या परिसरात येत आहे. त्याच्या कामाला सुरुवात झाली असून त्यामुळे हे केंद्र पुढील चौकातील महापालिकेच्या वाहनतळात स्थलांतरित होत आहे. या नव्या केंद्रांमध्ये सध्याच्या बदललेल्या रुचीनुसार मटार-पनीर, तसेच अन्य काही पंजाबी भाज्या, तसेच मसाला डोसासारखे पदार्थही ठेवण्यात येणार आहेत.  पालिकेने मंडळाला केंद्रासाठी म्हणून ९९ वर्षांच्या कराराने जागा दिली होती...................मेट्रो, महापालिका यांनी मंडळाला विनंती केल्याप्रमाणे मंडळाने ही जागा मेट्रोला देऊ केली आहे. मेट्रोची शहराला असलेली गरज लक्षात घेऊन मंडळाने यासाठी कोणत्याही व्यवहाराची किंवा लेखी करार वगैरेची मागणी केलेली नाही. ...........मेट्रो स्थानकाचे काम झाल्यानंतर वरील बाजूस तयार होणारी जागा प्राधान्यक्रमाने आम्हाला देण्यात यावी, तिथे असेच केंद्रे सुरू करण्यात येईल, या भागातील कष्टकरीवर्गाची ती आवश्यक गरज आहे. नव्या केंद्रातील कोणत्याही जेवणाची किंवा खाण्याच्या पदार्थाची किंमत २० रुपयांपेक्षा जास्त होणार नाही, यासाठी मंडळ दक्ष असेल, असे थोरात यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेfoodअन्न