शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

पंढरीचा पोहा आला अलंकापुरी। पंचक्रोशावरी साधुजन।।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 01:18 IST

अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणेला शनिवारपासून प्रारंभ : २२ ते ३१ डिसेंबर या कालावधीत १९० किलोमीटरचा पायी प्रवास

आळंदी : आळंदी-पंढरी महिना वारकरी, वारकरी शिक्षण संस्थेतील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा हरिनाम गजरात साजरी होत आहे. या वर्षी प्रदक्षिणेस माऊली मंदिरातून शनिवारी (दि. २२) दत्तजयंतीच्या दिवशी प्रारंभ होणार आहे. या सोहळ्याची सांगता ३१ डिसेंबर रोजी आळंदी मंदिरात होईल, अशी माहिती हभप बापूसाहेबमहाराज डफळ यांनी दिली.

पंचक्रोशी प्रदक्षिणा पुणे जिल्ह्यातील खेड, हवेली, मुळशी, मावळ, शिरूर अशा ५ तालुक्यांतून वारकऱ्यांसमवेत सोहळा रुपी सुरू आहे. या वर्षी २२ ते ३१ डिसेंबर या कालावधीत १९० किलोमीटरचा प्रवास या पंचक्रोशीतून प्रदक्षिणेत हरिनाम गजर होणार आहे. या प्रदक्षिणा सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम होतील. यात काकडा, गौळणी, भजन, भोजन, विश्रांतीत ज्ञानेश्वर माऊली कदम यांची प्रवचने, नेमाचे भजन, हरिपाठ तसेच मुक्कामाच्या ठिकाणी हरिकीर्तन होणार आहे.

श्री संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या संजीवन समाधीप्रसंगी जे महान साधू, संत, ऋषिमुनी, देव, देवता, गण, गंधर्व, यक्ष-किन्नर आले असता त्यांच्या वास्तव्याने अलंकापुरी पंचक्रोशी व्याप्त होती. तेव्हा संत नामदेवमहाराज यांच्यासह इतर साधू संत आणि देवदेवता यांनी जी प्रदक्षिणा केली तीच ही अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा होय. या पुण्यपावन पंचक्रोशी प्रदक्षिणेचे आयोजन माऊलींच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य हैबतरावबाबा यांच्या प्रेरणेतून पुढे १८३६पासून पुढे ४ पिढ्या गोविंद नेर्लेकर परिवार यांनी प्रदक्षिणा सुरू ठेवली. मात्र, पुढे १९६४मध्ये खंडित झालेली ही अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा ४८ वर्षांनंतर २०१२पासून वारकरी, भाविकांच्या आग्रहावरून हभप बापूसाहेब डफळ यांनी ही प्रदक्षिणा एक सोहळा या रूपात सुरू केली. दरम्यानच्या काळात आळंदी-पंढरीचे वारकरी वै. रोकडोबा दादामहाराज, वै. श्रीरंग बुवामहाराज आदींनी तसेच अनेक वारकरी, भाविकांनी आपापल्या सोयीनुसार वैयक्तिक स्वरूपात प्रदक्षिणा केली आहे. सध्या या पंचक्रोशी प्रदक्षिणेत मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होत असल्याचे हभप बापूसाहेबमहाराज डफळ यांनी सांगितले.

हभप कदम माऊलीमहाराज यांच्या आग्रहावरून येथील वारकरी शिक्षण संस्थेतील आजी-माजी विद्यार्थी सहभागी होऊ लागले आहेत.माऊली मंदिरातून शनिवारी (दि. २२) सकाळी नऊ वाजता हरिनाम गजरात ही प्रदक्षिणा सुरू होईल. पहिला मुक्काम मरकळ येथील श्री केशवराजमहाराज मंदिरात होईल. दुसरा मुक्काम दि. २३ रोजी चंदननगर खराडी, पाषाण- दि. २४, गहुंजे- दि. २५, थोपटवाडी करंजविहिरे- दि. २६, होलेवाडी- दि. २७, केंदूर- दि. २८, मरकळ- दि. २९, श्री ज्ञानेश्वरमहाराज मंदिर आळंदीत आगमन व मुक्काम- दि. ३० आणि प्रवास समाप्ती होईल. सोमवारी (दि. ३१) सकाळी माऊली मंदिरात काल्याच्या कीर्तनाने या पंचक्रोशी प्रदक्षिणेची सांगता होणार असल्याचे डफळमहाराज यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदी