शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Pandharpur Wari 2021 : शिवनेरी बसने माऊलींच्या पादुका पंढरीला जाणार; दीड किमी पायीवारी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 22:05 IST

आळंदी ते वाखरी विनाथांबा प्रवास; दीड किमी होणार पायीवारी

आळंदी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पायी वारीचे स्वरूप बदलून आषाढ शुद्ध दशमीला संतांच्या पादुका बसद्वारे थेट पंढरीत पोचविण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यानुसार माऊलींच्या चलपादुका सोमवारी (दि.१९) सकाळी नऊच्या सुमारास आळंदीतील आजोळघरातून पंढरपूरला प्रस्थान ठेवतील. दोन एसटी बसद्वारे अवघ्या चाळीस व्यक्तींसोबत विनाथांबा ही वारी वाखरीपर्यंत नेण्यात येणार आहे. दरम्यान वारीच्या प्रवास मार्गांवर गावोगावी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाकडून संपूर्ण वारी ने - आण करण्याची जबाबदारी खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर माऊलींच्या चलपादुका घेऊन जाणाऱ्या शिवनेरी बसचे सारथ्य लक्ष्मण पांडुरंग शीरसाठ  व रामचंद्र नामदेव ईधारे हे करणार आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खबरदारी म्हणून गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील मानाच्या संतांच्या पादुका पंढरीत नेण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. यापार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा प्रस्थान सोहळा जेष्ठ वद्य सप्तमीला तर तीर्थक्षेत्र आळंदीतून जेष्ठ वद्य अष्टमीला माऊलींच्या चलपादुकांचे प्रस्थान करण्यात आले होते. मात्र त्या दिवसापासून संतांच्या पादुका देहू व आळंदीतच मुक्कामी आहेत.

या पार्श्वभूमीवर माऊलींच्या चलपादुका पंढरीला नेण्यासाठी शासनाकडून दोन शिवनेरी बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या बसमध्ये प्रत्येकी वीस व्यक्तींना पादुकांसोबत जाण्याची परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे पादुकांसोबत पासष्ट वर्षांच्या आतील निमंत्रित व्यक्तीला प्रवेश दिला जाणार असून संबंधित व्यक्तींची कोरोना टेस्ट केली असल्याची माहिती सोहळा प्रमुख अँड. विकास ढगे - पाटील यांनी दिली.

यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना कोविड - १९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने घालून दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे असे नमूद केले आहे. मानाच्या पालखी सोहळ्यांना प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी केली जाणार आहे. कालाच्या कार्यक्रम पार पडल्यानंतर पौर्णिमेच्या (दि. २३) दिवशी वारी परतीसाठी आळंदीकडे प्रस्थान ठेवेल.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीcorona virusकोरोना वायरस बातम्या