शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Pandharpur Chi Wari: देहूतून पालखीचे प्रस्थान :तुकोबांसंगे वैष्णव निघाले पंढरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 05:41 IST

सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी श्रीक्षेत्र देहूगाव येथून वैष्णवांच्या मांदियाळीसह जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३४ व्या पालखी सोहळ्याने सोमवारी सायंकाळी पावणेसहाला पंढरीकडे प्रस्थान ठेवले.

- विश्वास मोरेदेहूगाव (जि. पुणे) -  भगव्या पताका आसमंती फडकवीत टाळ-मृदंगाचा कल्लोळ आणि वीणेचा झंकार करीत, ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करीत सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी श्रीक्षेत्र देहूगाव येथून वैष्णवांच्या मांदियाळीसह जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३४ व्या पालखी सोहळ्याने सोमवारी सायंकाळी पावणेसहाला पंढरीकडे प्रस्थान ठेवले.‘भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी देहूनगरी आज नादावली’ अशी अनुभूती देहूनगरीत सोमवारी आली. वैष्णवांच्या गर्दीने इंद्रायणीतीर भक्तिमय झाला होता. प्रस्थान सोहळा असल्याने सकाळपासूनच देहूनगरीत एक वेगळेच चैतन्य जाणवत होते. ढगाळ वातावरण आणि उकाडाही जाणवत होता. असे असतानाही वारीचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. तत्पूर्वी सोमवारी पहाटे नैमित्तिक महापूजा झाली. श्रीसंत तुकाराम महाराज संस्थानाच्या वतीने सोहळाप्रमुख संजय मोरे, काशिनाथ मोरे, अजित मोरे यांनी शिळा मंदिरात महापूजा केली. पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायणमहाराज यांच्या समाधी मंदिरात विश्वस्त माणिक मोरे, विशाल मोरे, संतोष मोरे यांनी महापूजा केली.घोडेकर सराफ यांच्याकडे झळाळी देऊन महाराजांच्या पादुका मानकरी म्हसलेकर यांनी इनामदार वाड्यात सकाळी दहाच्या सुमारास आणल्या. तिथे दिलीपमहाराज गोसावी (मोरे) इनामदार यांच्या हस्ते विधिवत पूजा केली. तोपर्यंत मुख्य मंदिरातील वीणा मंडपात हभप रामदास नाना मोरे यांचे काल्याचे कीर्तन सुरू होते.सकाळपासूनच इंद्रायणीत स्रान करून वारकरी मंदिरात दर्शन घेण्यास येत होते. प्रस्थानाची वेळ जवळ येऊ लागली, तशी मंदिराच्या आवारात दिंडीकऱ्यांची गर्दी होऊ लागली. टाळ-मृदंगाचा कल्लोळ सुरू झाला. वीणेचा झंकाराने वातावरण भक्तिमय झाले. अडीचला प्रस्थान सोहळा सुरू झाला. या वेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, देवस्थानाचे अध्यक्ष मधुकर मोरे आदी उपस्थित होते.सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी ‘चला पंढरीशी जाऊ, रखुमादेवीवरा पाहू...’ असे म्हणत श्रीक्षेत्र देहूगाव येथून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३४ व्या पालखी सोहळ्याने सोमवारी सायंकाळी पावणेसहाला पंढरीकडे प्रस्थान ठेवले. टाळ-मृदंग, हरिनाम गजराने अवघी देहूनगरी भक्तिमय झाली होती. वीणामंडपातून पालखी बाहेर आल्यानंतर दर्शनासाठी लोटलेली वारकऱ्यांची गर्दी.

टॅग्स :sant tukaramसंत तुकारामdehuदेहूPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखी