शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पंढरीची वारी देवाला भेटण्याचा राजमार्ग :- बबनराव पाचपुते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 19:40 IST

संतांच्या संगतीत राहून सत्कर्म करत राहा. हे शरीर परोपकारासाठी आहे. हे ही विसरू नका...

आळंदी : वारीमुळे काया, वाचा, मन आणि बुध्दी शुध्द होते. त्यामुळे आपण देवाशी एकरूप होतो. हे सर्व संत संगतीने घडल्याने आपण सर्व प्रापंचिक विवंचना विसरून जातो. त्यामुळे देवाला भेटण्याचा पंढरीची वारी हा खरा राजमार्ग असल्याचे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ह.भ.प.बबनराव पाचपुते यांनी सांगितले.विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या वतीने संत ज्ञानेश्‍वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्‍वरूप दर्शन मंचावर लोकशिक्षण पार उपक्रमात ते बोलत होते. युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रमाचा समारोप प्रसंगी कांग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ कराड,उर्मिला कराड, उषा कराड, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.अरूण जामकर, पं. उध्दवबापू आपेगावकर, समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे, ह.भ.प.तुकाराम महाराज गरूड, ठाकुरबुवा दैठणकर, ह.भ.प. डॉ.सुदाम महाराज पानेगावकर, ह.भ.प. शालीग्राम खंदा,ह.भ.प. नलावडे महाराज उपस्थित होते.      पाचपुते म्हणाले, या सृष्टीवरील सर्वश्रेष्ठ सत्य हे मृत्यू असल्याने घाबरू नका, ते आज नाही तर उद्या येणारच आहे. अशा वेळेस संतांच्या संगतीत राहून सत्कर्म करीत रहा. हे शरीर परोपकारासाठी आहे. हे ही विसरू नका. वारकर्‍याने आचार, विचार, आहार आणि विहार शुध्द ठेवल्यास परमार्थ लवकरच मिळतो. मानसाच मन हे लोखंडा सारखा झाल आहे. जो पर्यंत त्याला वैराग्याने तापविणार नाही तो पर्यंत त्याला आकार देता येणार नाही. ईश्‍वराकडे जाण्यासाठी मन मोकळे ठेवावे लागते.ह.भ.प.दैठणकर म्हणाले, संत सदैव आत्मसुख देऊन दुःखाचे निवारण करतात. संतांचे सौदर्य हे त्यांच्या चरणी असते. त्यामुळे वारकर्‍यांनी संतांच्या चरणी शरण जावे, संतांच्या विचारांची सेवा करावी, त्यांच्या विचारांना आचरणात आणावे, संत जो मार्ग दाखविले त्यावर चालावे, वारकर्‍यांनी साधनेसाठी दृढ व्हावे आणि संतांप्रमाणे परोपकारी व्हावे. सर्व वारकर्‍यांना आळंदीला येण्याचे कारण हेच आहे की येथे माऊलीची ऊर्जा मिळते. तसेच वारकर्‍यांनी संताच्या ऐवजी विठोबाचे मंदिर बांधा आणि संतांना ग्रंथात शोधा.उल्हास पवार म्हणाले, आपल्यातील अहंकार कमी करण्यासाठी सर्वांनी वारी ही केलीच पाहिजे. यामध्ये ज्ञान, कर्म आणि भक्तीचा संगम होतांना दिसून येतो. तसेच, यातून अध्यात्माची आणि तत्वज्ञानाची अनुभूती मिळते.ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. किसन महाराज साखरे यांचे कीर्तन झाले.संजीव मेहेंदळे, ऋषिकेश बडवे,संपदा थिटे व सहकारी यांनी राजा परांजपे प्रतिष्ठान निर्मित अभंगरंग कार्यक्रम सादर केला. इंद्रायणीच्या दोन्ही तीरावरील लाखो वारकर्‍यांनी अध्यात्मिक अनुभूतीचा लाभ यावेळी घेतला.   प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन ह.भ.प. डॉ.सुदाम महाराज पानेगावकर यांनी केले. ह.भ.प. शालीग्राम खंदारे यांनी आभार मानले.

अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं 

टॅग्स :AlandiआळंदीBabanrao Pachaputeबबनराव पाचपुतेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी