पेमदरा सरपंचावर विनयभंगाचा गुन्हा

By Admin | Updated: February 25, 2016 04:03 IST2016-02-25T04:03:33+5:302016-02-25T04:03:33+5:30

पेमदरा येथील एका महिलेने व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या बातमीबाबत सरपंचाला विचारणा केली असता त्याने संबंधित महिला व तिच्या मुलीला अश्लील शिवीगाळ करीत मारहाण करून

Pamadra Sarpanch on molestation case | पेमदरा सरपंचावर विनयभंगाचा गुन्हा

पेमदरा सरपंचावर विनयभंगाचा गुन्हा

आळेफाटा : पेमदरा येथील एका महिलेने व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या बातमीबाबत सरपंचाला विचारणा केली असता त्याने संबंधित महिला व तिच्या मुलीला अश्लील शिवीगाळ करीत मारहाण करून लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी सरपंचाविरुद्ध आळेफाटा पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार शंकर करवंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेमदरा येथील सरपंच विठ्ठल कृष्णा बेलकर हे आणे येथे जुन्या एसटी स्टॅन्डच्या समोरील बाजूस असलेल्या एका हॉटेलच्या बाजूला आले असता, पेमदरा येथीलच एक महिला किराणा माल घेण्यासाठी आली होती.
रात्री व्हॉट्सअ‍ॅपवर पतीच्या विरोधात टाकलेल्या आशयाबाबत महिलेने सरपंचाकडे विचारणा केली. मात्र, सरपंचाने संबंधित महिलेला अश्लील शिवीगाळ करत पेपरला आलेली ‘ग्रामपंचायत सदस्याची डीएनए टेस्ट’ ही बातमी तुझ्या पतीनेच दिली असल्याचे सांगत, तुझ्या पतीला मारून टाकतो, असे म्हणत संबंधित महिलेसह तिच्या मुलीलाही मारहाण केली. याबाबत अधिक तपास आळेफाटा पोलीस करीत असून, पोलिसांनी सरपंचाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Pamadra Sarpanch on molestation case