पालखी सोहळयातील वाहनांची होणार तपासणी
By Admin | Updated: June 6, 2014 23:30 IST2014-06-06T21:44:14+5:302014-06-06T23:30:20+5:30
आळंदी रोड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) ९ जून ते १९ जून २०१४ या काळात तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे,

पालखी सोहळयातील वाहनांची होणार तपासणी
पुणे : संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळयामध्ये सहभागी होणार्या वाहनांची आळंदी रोड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) ९ जून ते १९ जून २०१४ या काळात तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे, तरी या सुविधेचा पालखी सोहळयात सहभागी होणार्या सर्व वाहनचालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आरटीओच्यावतीने करण्यात आले आहे.
पालखी सोहळया दरम्यान वाहनांमधील तांत्रिक दोषांमुळे बंद पडून वाहतुकीला अडथळा होऊ नये याकरिता त्यांची पूर्व तपासणी करण्यात येत आहे. ट्रक, जीप सह अनेक जड वाहने सोहळयात सहभागी होत असतात.