पालखी वीरकडे रवाना
By Admin | Updated: February 4, 2015 00:07 IST2015-02-04T00:07:42+5:302015-02-04T00:07:42+5:30
नाथसाहेबाचं चांगभलं’च्या गजरात म्हस्कोबा देवाच्या पालखी - काठीने कोडीत (पुरंदर) येथील तुळाजीबुवा मंदिर येथून हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजता प्रस्थान ठेवले.

पालखी वीरकडे रवाना
गराडे / नारायणपूर : वीर (पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या १० दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी आज ‘सवाई सर्जाचं चांगभलं, नाथसाहेबाचं चांगभलं’च्या गजरात म्हस्कोबा देवाच्या पालखी - काठीने कोडीत (पुरंदर) येथील तुळाजीबुवा मंदिर येथून हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजता प्रस्थान ठेवले.
२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता देऊळवाड्यातून ग्रामप्रदक्षिणा घेऊन रात्री ९ वाजता पालखी व देवाची काठी तुळाजीबुवा मंदिरात मुक्कामी आली. सकाळी सहा वाजता उत्सवमूर्तींना महाअभिषेक करून पारंपरिक पद्धतीने लाडू-करंज्याचा नैवेद्य दाखवून दर्शनासाठी पालखी ठेवण्यात आली. या वेळी डागदार, तुळाजी बुवा मंडळाचे पदाधिकारी, श्री देवनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
धनगर काळू कोकरे यांचे
कोडीत-भिवडीदरम्यान बकऱ्याचे गोल रिंगण झाले. हजारो भाविक कोडीत ते वीर हा जवळपास ३५ कि.मी. अंतर पायी चालतात. राऊतवाडी येथे पहिला विसावा झाला. वीरच्या वेशीवर वीरचे मानकरी, सालकरी, डागदार, वीर देवस्थानचे ट्रस्टी यांनी कोडीतकरांचे स्वागत केले. त्यानंतर पालखी मंदिराजवळील ओट्यावर ठेवण्यात आली. वीर परिसरातील बहुतेक गावांतील घरातील एका व्यक्तीचा गेली चार दिवस उपवास होता. याठिकाणी पालखीला नैवेद्य दाखवून येथील नागरिकांनी उपवास सोडले. त्यानंतर नगारखान्याजवळील शाहू महाराज भोसले यांची मानाच्या दीपमाळाचे प्रज्वलन कोडीतकरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ( वार्ताहर )
रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी
पालखी लग्नासाठी निघेल. त्यानंतर १२ वाजता श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी मातादेवांता लग्नाचा सोहळा होईल. त्यानंतर पालखीची ग्रामप्रदक्षिणा होऊन पुन्हा पालखी कट्ट्यावर ठेवण्यात येते. येथून ९ दिवसांचा सोहळा सुरू होतो, असे श्रीनाथ म्हस्कोबा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.