पालखी सोहळ्याची सुरुवात किल्ले पुरंदर येथून
By Admin | Updated: March 23, 2017 04:08 IST2017-03-23T04:08:13+5:302017-03-23T04:08:13+5:30
धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराज यांच्या ३१७ व्या पुण्यतिथीनिमित्त धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण

पालखी सोहळ्याची सुरुवात किल्ले पुरंदर येथून
लोणीकंद : धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराज यांच्या ३१७ व्या पुण्यतिथीनिमित्त धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. शनिवार (दि. २५) रोजी पालखी सोहळ्याची सुरुवात महाराजांचे जन्मस्थळ किल्ले पुरंदर येथून सकाळी ७ वाजता होणार आहे. पालखी सोहळ्याची सांगता सोमवार, दि. २७ मार्च रोजी श्रीक्षेत्र तुळापूर, वढू बु. येथे होणार असल्याची माहिती पालखी सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली.
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी छत्रपती संभाजीमहाराज यांचा राज्याभिषेक करण्याकरिता महत्त्वाची भूमिका घेतली होती. त्या गोष्टीचे महत्त्व लक्षात घेऊन पालखीच्या अश्वाचा मान अकलूजचे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांना देण्यात आला आहे.
पालखी सोहळ्याचा मुक्काम व विसावासाठी नारायणपूर, सासवड, वडकी, मांजरी बु.,वाघोली व फुलगाव येथील ग्रामस्थ श्रम घेत आहे. या वर्षी २६ मार्च रोजी वाघोली मुक्कामी छत्रपती संभाजीमहाराज यांच्या जीवनावर शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.
याकरिता पालखी सोहळा समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये अध्यक्ष संदीप भोंडवे, राजेंद्र सातव, सचिन भंडारे, पांडुरंग आरघडे, शिवाजी शिवले व ज्ञानेश्वर शिवले, तर सदस्य म्हणून आबासाहेब मांढरे, तानाजी चौधरी, श्यामराव खुटवड, महेश टेळे, तात्यासाहेब भाडाळे, रवींद्र कंद, नीलेश वाळके, दशरथ वाळके, संतोष गायकवाड, विजय ढमढेरे, नितीन वाघमारे, भाऊसाहेब चौधरी, आत्माराम वाळके, नितीन भोंडवे, सचिन पलांडे, आबासाहेब सोनवणे, विपुल शितोळे, महेंद्र महाडीक, मिलिंद हरगुडे, रामभाऊ दरेकर, नवनाथ कटके, उत्तमराव गायकवाड, दत्तात्रय शिवले व ज्ञानेश्वर शिवले हे काम पाहत आहे. (वार्ताहर)