शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचा नवा डाव; व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून महिला, तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 15:25 IST

वैयक्तिक माहिती मिळवून फसवणुकीची शक्यता

पिंपरी : भारतासमोर रणभूमीवर टिकाव धरू शकत नसल्याचे लक्षात आल्याने पाकिस्तानने सोशल मीडियाचा वापर करून नवनवे डावपेच आखल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. पाकिस्तानातील काही गटांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून हनी ट्रॅपचा प्रकार झाल्याचेही उघडकीस आले आहे. अशाच पद्धतीने व्हिडीओ कॉल करून महिला तसेच तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रकार होत असून, यातून फसवणुकीची शक्यता आहे.पिंपरी येथील एका महिलेला व्हॉटसअपवरून एका अनोळखी क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. पाकिस्तानातील +९२ या सिरीजने सुरू होणारा हा क्रमांक असल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी संबंधित क्रमांक ब्लॉक केला. त्यानंतर अशाच अनोळखी क्रमांकावरून पुन्हा व्हिडीओ कॉल आला. तसेच त्या क्रमांकावरून चॅटिंग सुरू झाले. आप शादीशुदा हो या नही, असे काही प्रश्न चॅटिंगदरम्यान विचारण्यात आले. मात्र संबंधित महिलेने त्याला प्रतिसाद न देता पुन्हा त्या क्रमांकाला ब्लॉक केले. संबंधित महिलेच्या पतीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. लॉकडाऊन असल्याने प्रत्यक्ष पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदविणे शक्य नसल्याने ऑनलाइन तक्रार नोंदविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाच्या अधिकाºयांनी देखील संबंधित महिला व त्यांच्या पतीशी संपर्क साधला आहे. माझ्या पत्नीकडे असलेल्या फोनवर अनोळखी व्हॉटसअप व्हिडीओ कॉल आला. संबंधित व्यक्तीने काही मोबाइल अ‍ॅप्सच्या माध्यमातून माझ्या पत्नीचे नाव शोधले. तिच्या नावाचा चॅटिंगमध्ये उल्लेख केला. त्यामुळे आम्ही ते सर्व क्रमांक लागलीच ब्लॉक केले. मात्र यापुढेही त्यांच्याकडून असा प्रकार होण्याची शक्यता वाटते. याबाबत पोलिसांना संपर्क साधला आहे, असे संबंधित पीडित महिलेच्या पतीने सांगितले. 

कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेले त्यातही आंतरराष्ट्रीय कोड असलेल्या क्रमांकाचे कॉल शक्यतो घेऊ नयेत. कोणत्याही संशयास्पद क्रमांकावरून कॉल आल्यास १९६३ किंवा १८००११०४२० या क्रमांकावर रिपोर्ट करावे. स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्यासाठी आपल्या मोबाइलमधील डू नॉट डिस्टर्ब (डीएनडी) अ‍ॅक्टिव्हेट करावे. आपली वैयक्तिक माहिती अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलवर किंवा व्यक्तिला देऊ नये. - सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान