शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक भारतीयाला सुखरूप घरी पोहोचवणं हीच सर्वात मोठी जबाबदारी;सुप्रिया सुळेंची भावनिक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:36 IST

- ही काही नफा कमावण्याची वेळ नाही, तर प्रत्येक भारतीय नागरिकाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे

पुणे -  वन नेशन, वन इलेक्शन विषयावर दिल्लीमध्ये सुरू असलेल्या बैठकीदरम्यान  जम्मू- काश्मीरच्या पहलगाममधील घटनेबाबत माहिती मिळाली. यानंतर काही वेळात मला पुण्यातील सुद्धा पर्यटक अडकले असल्याची माहिती मिळाली आहे.  पुण्यातील दुर्दैवी घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. या घटनेत पुण्यातील दोन नागरिकांना गोळ्या लागल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक भावनिक आणि जबाबदारीने परिपूर्ण प्रतिक्रिया दिली.

माध्यमांशी बोलतांना त्या पुढे म्हणाल्या,ही घटना अत्यंत गंभीर असून आपण कितीही निषेध केला तरी तो अपुरा ठरेल. जोपर्यंत गृहमंत्रालयाकडून अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत सर्वांनी जबाबदारीने आणि संयमाने वक्तव्य करावीत. असे आवाहनही त्यांनी केलं.सुळे यांनी मुख्यमंत्री उमरअब्दुल्लांशी संपर्क साधून माहिती घेतली आणि केंद्राकडे तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली. सध्या अनेक भारतीय नागरिक विविध भागांत अडकले असून, त्यांचं सुरक्षितरित्या घरी पोहोचणं हेच सध्या सर्वात महत्त्वाचं आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व घडामोडींची माहिती घेतल्यानंतर तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलावून सर्वांना योग्य माहिती द्यावी.विमानाच्या आणि रेल्वेच्या तिकिटांचे वाढलेले दर लक्षात घेता, सुळे यांनी विमान व रेल्वे प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ही काही नफा कमावण्याची वेळ नाही, तर प्रत्येक भारतीय नागरिकाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. असे सांगत त्यांनी शासन आणि प्रशासनाला संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन केले. संपूर्ण घटनेबाबतची माहिती मिळेपर्यंत संयम, सहकार्य आणि जबाबदारीचे भान राखण्याचे आवाहन सुळे यांनी सर्वसामान्य नागरिकांनाही केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला