पाश्र्व पद्मावती मातेचे विधीवत पूजन !
By Admin | Updated: August 6, 2014 00:05 IST2014-08-06T00:05:31+5:302014-08-06T00:05:31+5:30
प.पू.आचार्य विजय प्रभाकर सुरीश्वरजी म.सा.आदी ठाणा यांच्या सान्निध्यात शंकरशेठ रोड वरील मोकळ्या जागेत भव्य विधिवत पद्धतीने पाश्र्व पद्मावतीमातेचे

पाश्र्व पद्मावती मातेचे विधीवत पूजन !
बिबवेवाडी : दादावाडी जैन मंदिर
येथे चातुर्मासाठी आलेले
प.पू.आचार्य विजय प्रभाकर सुरीश्वरजी म.सा.आदी ठाणा यांच्या सान्निध्यात शंकरशेठ रोड वरील मोकळ्या जागेत भव्य विधिवत पद्धतीने पाश्र्व पद्मावतीमातेचे
पूजन करण्यात आले. यामध्ये समाजाच्या व जगाच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली.
जैन समाजाचे 23वे
तीर्थंकर प.पू. पाश्वर्नाथ भगवान यांच्या अधिष्ठायीका देवी पद्मावतीमातेचे पूजन
करण्यासाठी पुण्यामध्ये
भव्य वाराणसी नगरीचा देखावा उभा करण्यात आला होता. त्यामध्ये इंद्र दरबाराप्रमाणो दरबार बनवण्यात आला होता.
सुमारे 15 हजारांहून अधिक भाविक यावेळी उपस्थित होते. विविध चढाव्यामध्ये अॅड. एस.के. जैन, शांताबाई पुखराज राठोड, प्रकाश नाणोशा, सुखीबाई भीमराज छाजेड, जयंतीलाल दलरेशा यांना लाभ मिळाला. या वेळी प.पू.गुरुदेव यांनी तयार केलेल्या ‘आगासी तीर्थ की महिमा’ या पुस्तिकेचे प्रकाशन उद्योगपती रसिकलाल धारिवाल, शोभा धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष भंवरलाल जैन, संघाचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, जयंतीलाल जैन, पुखराज जैन, शांतिलाल जैन, दिलीप मेहता, महावीर छाजेड, संपत जैन, भरत सुराणा, सुहास बोरा, महेश बोरा, साकलचंद कटारिया, नरेश राठोड यांच्यासह संघाच्या सर्व पदाधिका:यांनी प्रय} केले.
(वार्ताहर)
4अश्वसेन महाराज व वामादेवी यांनी ज्या पद्धतीने मातेचे पूजन केले होते, अगदी तशाच पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ओमप्रकाश रांका व गुणवंती रांका यांना अश्वसेन महाराज व वामादेवी बनण्याचा लाभ देण्यात आला. विविध प्रकारच्या मंत्नांचे सुमारे 4 तासाहून अधिक उच्चारण केल्यानंतर आठ प्रकारच्या विविध पूजा करण्यात आल्या. कार्यक्रमाला मोठय़ा प्रमाणावर भाविक उपस्थित होते.
4समाजासाठी व जगाच्या शांततेसाठी केली प्रार्थना
4इंद्राचा भरविला दरबार
4पंधरा हजार भाविकांनी
लावली उपस्थिती