शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी भातशेती संकटात; उत्पादन घटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 02:00 IST

शेतकरीवर्ग धास्तावला, अनेक ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव

डिंभे : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात १५ दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. भातउत्पादक क्षेत्र असणाऱ्या जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पंचमीपासून पावसाने काढता पाय घेतल्याने भातशेती संकटात सापडली आहे.पावसाच्या अभावाबरोबरच अनेक ठिकाणी भातपिकाला रोगाची लागण झाल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. भातपीकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होवू लागला आहे. अनेक ठिकाणी भात शिवार पिवळी पडू लागली आहेत.जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, पुरंदर या तालुक्यांत सुमारे ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी भाताचे उत्पादन घेतले जाते. जून-जुलैत चांगला पाऊस झाल्याने शेतकºयांनी जोमाने भातपिकाची लागवण केली. लागवड केलेले भातक्षेत्र तयार होण्यासाठी साडेतीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. आॅक्टोबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात पिवळेधमक भातक्षेत्र तयार होऊन जिर, रायभोग, इंद्रायणी, साळ, कोलम जातीच्या भातशेतीचा सुगंध परिसरात दरवळत असतो.३ आठवड्यांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने भातखाचरामधील पाणी हळूहळू आटून गेले. सर्वत्र भात खाचरे कोरडी पडल्याचे चित्र दिसत आहे. खाचरांत पाणीच नसल्याने सध्या लागवड केलेल्या भातशेतीचे शेंडे पिवळे पडू लागले आहेत. काही ठिकाणी भातशेतीला करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. भातशेती चांगली पिकणार, ही आशा बाळगून असलेल्या शेतकरीवर्गाच्या मनात अपुरा पाऊस आणि करपा रागाची झालेली लागण यामुळे चिंतेचे ढग जमा झाले आहेत.आंबेगांव तालुक्याच्या आदिवासी भागातील पाटण, आहुपे व भीमाशंकर खोºयात जवळपास ८० टक्के शेतकरी गरव्या जातीची भातशेती करत असल्याचे पाहावयास मिळते. मात्र या तालुक्यात ३ आठवड्यापासून पाऊस गायब आहे. यामुळे भातशेती अडचणीत सापडली आहे. फुलवडे, बोरघर, अडिवरे, कोंढवळ, पाटण, कुशिरे, महाळुंगे, पोखरी, चिखली या भागातील भातशेती पिवळी पडू लागली आहे.अनेक तालुक्यांतील भातपिकांना फटकापेरणीच्या वेळेस योग्य वेळी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणची भात रोपे लावडीसाठी योग्य वेळी तयार झाली होती. पावसाचा अंदाज येताच शेतकºयांनी धूळवाफेवर पेरण्या केल्या होत्या. पेरणीसाठी यंदा रोहिणीची वाफ लागल्याचे बोलले जात होते. पुढे पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे भात लगावडीसाठी कोठेही खोळंबा वा विलंब झाला नाही. लागवड वेळेत उरकल्याने भातउत्पादक शेतकºयांच्या चेहºयावर समाधान होते. मात्र हे पीक ऐन भरात असतानाच जुन्नर, आंबेगांव, खेड तालुक्यासह सर्वत्रच पावसाने काढता पाय घेतला.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस