पडळकर यांचे कृत्य भ्याड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:12 IST2021-02-13T04:12:30+5:302021-02-13T04:12:30+5:30
जेजुरी: उद्या शनिवारी खा. शरद पवार यांच्या हस्ते होऊ घातलेल्या राजमाता अहिल्यादेवींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज पहाटेच भाजपचे आ. ...

पडळकर यांचे कृत्य भ्याड
जेजुरी: उद्या शनिवारी खा. शरद पवार यांच्या हस्ते होऊ घातलेल्या राजमाता अहिल्यादेवींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज पहाटेच भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी अनावरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी खा. शरद पवारांवर जहरी टीका ही केली होती. या घटनेनंतर जेजुरी व पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले होते. दुपारी त्यांनी जेजुरीतील मल्हारगडाच्या पायथ्याला नंदी चौकात जाहीर सभा घेत गोपीचंद पडळकर यांच्या या स्टंटबाजीचा निषेध केला.
यावेळी पुरंदरचे माजी आ. अशोक टेकवडे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे पाटील, उपाध्यक्ष संदीप चिकणे, धनगर समाजाचे नेते अशोक बरकडे, जेजुरीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक जयदीप बारभाई यांनी ही आ. पडळकर यांच्यावर टीका केली.
आ. पडळकर यांचे रात्रीच्या अंधारात गुपचूप येऊन केलेले हे कृत्य अत्यंत भ्याडपणाचे व केविलवाणे असून हिम्मत असेल तर पुन्हा पुरंदर तालुक्यात येऊन दाखवावे. पळपुट्या पडळकर मुर्दाबाद, शरद पवार जिंदाबाद, अशा घोषणा ही देण्यात आल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.