शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हवेली तालुक्यात सोळा तासांहून अधिक काळ ऑक्सिजन पुरवठा बंद, रुग्णालयांमध्ये गोंधळाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 18:55 IST

दौंड तालुका प्रशासनाची मनमानी

ठळक मुद्देपुढील काही तासांतच हवेली तालुक्यातील पुरवठा सुरळीत होणार असल्याचे अतिरीक्त तहसीलदार यांचे आवाहन

उरुळी कांचन: कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजन तुटवड्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. दौंड तालुका प्रशासनाने यवत येथील एका ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या प्लॅन्टमधून पूर्व हवेली तालुक्यात तसेच जिल्हयातील इतर भागांत होणारा ऑक्सिजन पुरवठा मनमानी पद्धतीने काल रात्री ८ पासून बंद केला आहे.  अनेक रुग्णालयांतील ऑक्सिजनचा पुरवठा १६ तासहून अधिक काळ बंद राहिल्याने रुग्णालयात गोंधळ उडाला आहे.  

दौंड तालुक्यातील यवत येथे गुरुदत्त एंटरप्राइजेस नामक ६ टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लॅन्ट आहे. या ऑक्सिजन प्लँटमधून पूर्व हवेली तालुक्यात तसेच जिल्ह्यातील अनेक भागांत ऑक्सिजन पुरवठा सुरू होता. मंगळवारी दौंड तालुका प्रशासनाने उर्वरीत भागातील पुरवठा बंद करुन केवळ दौंड तालुक्यातील सर्व रुग्णालयांतील ऑक्सिजनची कमरता बघता फक्त दौंड तालुक्यापुरता पुरवठा सुरू ठेवला.  

दौंड तालुक्यातील अनेक रुग्ण हवेलीच्या उरुळी कांचन शहरात उपचार घेत आहेत. या ठिकाणी पुरवठा बंद ठेऊन दौंडचा 'स्वाभिमान ' कमी होणार नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान दौंड प्रशासनाच्या या भूमिकेवर हवेलीकर संतप्त झाले असून पुढील काळात रेमडेसीवीर व ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास जिल्हाधिकाऱी कार्यालयावर ठिय्या मांडु असा इशारा भाजपचे युवा नेते अजिंक्य कांचन यांनी दिला आहे. "

दौंड तालुक्यातून हवेलीसाठी होणारा ऑक्सिजन पुरवठा मंगळवार रात्रीपासून बंद असल्याची बाब खरी आहे. जिल्हाधिकारी यांना याबाबत कल्पना दिली आहे. त्यांच्या सूचने नुसार हवेली तालुक्यातील अधिकाऱ्यांचे पथक घेऊन मी स्वतःया ऑक्सिजन प्लॅन्ट मध्ये जाऊन पुरवठा सुरळीत करणार आहे. पुढील काही तासांतच तालुक्यातील पुरवठा सुरळीत होणार असल्याचे अतिरीक्त तहसीलदार विजयकुमार चौबे यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याuruli kanchanउरुळी कांचन