एमआयटी एडीटी विद्यापीठाने विकसित केले ऑक्सिजन सयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:56+5:302021-06-09T04:13:56+5:30

लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्रा. डॉ. राजेश जाधव यांनी ...

Oxygen plant developed by MIT ADT University | एमआयटी एडीटी विद्यापीठाने विकसित केले ऑक्सिजन सयंत्र

एमआयटी एडीटी विद्यापीठाने विकसित केले ऑक्सिजन सयंत्र

लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्रा. डॉ. राजेश जाधव यांनी प्रायोगिक तत्त्वावर वातावरणातील घटक एकत्र करून ‘प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन’ तंत्रज्ञानाचा वापर करून ऑक्सिजन तयार करणारे सयंत्र विकसित केले आहे. यासाठी एक्स्ट्रिम इंजिनिअरिंग अक्विपमेंट या कंपनीने सहकार्य केले आहे.

याविषयीची माहिती देताना प्रा. डॉ. राजेश जाधव म्हणाले की, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करून आम्ही या ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केली आहे. यात आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचे उत्पादन वाढविता अथवा कमी करता येणार आहे. तसेच यात वायुसंवेदन आणि पीएलसी तंत्रावर आधारित अलार्म सिस्टम बसविण्यात आले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या आणि त्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनची कमी पूर्ण करण्यासाठी या प्लांटचा लाभ होणार आहे. वैद्यकीय वापरासाठी ९३ टक्के ऑक्सिजनची धनता मिळणार आहे. या सयंत्रावर डिजिटल डिस्प्ले बसविण्यात आले आहे. याद्वारे ऑक्सिजनची शुद्धता आणि दबाव लक्षात येण्यास मदत होणार आहे.

प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन तंत्रज्ञानाचा वापर

एमआयटी एडीटी विद्यापीठ आणि एक्स्ट्रिम इंजिनिअरिंग अक्विपमेंट या कंपनीच्या सहकार्याने स्प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन तंत्रज्ञानाचा वापर करून हा ऑक्सिजन प्लांट तयार केला आहे. ऑक्सिजन सिलिंडरच्या मागणीनुसार आपल्याला यामध्ये आवश्यक ते बदल करता येतात. ऑक्सिजन मिळविण्याच्या मेंबरेन किंवा क्रायोजेनिक पद्धतीनपेक्षा स्प्रेशर स्विंग ॲबसॉर्प्शन हे तंत्रज्ञान स्वस्त व सुरक्षित आहे. वातावरणातील हवा शोषून, पी.एस.ए. तंत्राचा वापर करुन रुग्‍णांना ऑक्सिजन पुरवठा करताना, सर्वप्रथम संयंत्रांमध्‍ये योग्‍य दाबाने हवा संकलित (कॉम्‍प्रेस) केली जाते. त्‍यानंतर ती हवा शुद्ध (फिल्टर) करण्‍यात येते. त्‍यामुळे हवेतील अशुद्ध घटक जसे की, धूळ, तेल, इंधन यांचे अतिसूक्ष्‍म कण, इतर अयोग्‍य घटक गाळून वेगळे केले जातात. या प्रक्र‍ियेनंतर उपलब्‍ध झालेली शुद्ध हवा 'ऑक्‍स‍िजन जनरेटर'मध्‍ये संकलित केली जाते. ऑक्‍स‍िजन जनरेटरमध्‍ये असलेल्‍या झि‍ओलीटया रसायनयुक्‍त मिश्रणाद्वारे या शुद्ध हवेतून नायट्रोजन आणि ऑक्‍स‍िजन हे दोन्‍ही वायू वेगळे केले जातात. वेगळा करण्‍यात आलेला ऑक्‍स‍िजन अर्थात प्राणवायू हा योग्‍य दाबासह स्‍वतंत्रपणे साठवला जातो. तेथून तो पाईपद्वारे रुग्‍णांपर्यंत पोहोचवला जातो, असे डॉ. राजेश जाधव यांनी सांगितले.

या यशाबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल डॉ. किशोर रवांदे, स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या अधिष्ठाता डॉ. रजनीश कौर बेदी,विभाग प्रमुख डॉ शालिनी गर्ग यांनी डॉ. राजेश जाधव यांचे अभिनंदन केले.

Web Title: Oxygen plant developed by MIT ADT University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.