जेजुरी काेविड सेंटरला दिले ऑक्सिजन मशिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:11 IST2021-05-10T04:11:10+5:302021-05-10T04:11:10+5:30

रविवारी आमदार संजय जगताप यांनी जेजुरी येथील कोविड सेंटरला भेट देऊन येथील रुग्णांशी हितगुज करून देवसंस्थान, ग्रामीण रुग्णालय व ...

Oxygen machine donated to the Jury Cavid Center | जेजुरी काेविड सेंटरला दिले ऑक्सिजन मशिन

जेजुरी काेविड सेंटरला दिले ऑक्सिजन मशिन

रविवारी आमदार संजय जगताप यांनी जेजुरी येथील कोविड सेंटरला भेट देऊन येथील रुग्णांशी हितगुज करून देवसंस्थान, ग्रामीण रुग्णालय व प्रशासनाकडून सर्व प्रकारच्या चांगल्या सुविधा दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार जगताप म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यासाठी ६८ ऑक्सिजन मशिन दिले असून यातील १० मशिन हे पुरंदरला मिळाले आहेत. जेजुरी, नीरा, वाल्हे, वीर, दिवे व खळद येथील कोविड सेंटरला हे मशिन देण्यात आले आहेत. यावेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, श्री मार्तंड देवसंस्थांनचे विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, नगराध्यक्षा वीणा सोनवणे, नगरसेविका रुक्मिणी जगताप, नगरसेवक अजिंक्य देशमुख, महेश दरेकर, डॉ. सुमित काकडे, शिक्षक नेते महादेव माळवदकर, संदीप जगताप आदी उपस्थित होते.

०९जेजुरी

जेजुरी कोविड सेंटरला ऑक्सिजन मशिन देताना आमदार संजय जगताप.

Web Title: Oxygen machine donated to the Jury Cavid Center