शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याच्या मृत्यू प्रकरणी केअर टेकरच्या विरोधात मालकाची तक्रार; लोणावळ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 11:01 IST

पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पडून कुत्र्याचा मृत्यू...

ठळक मुद्देलोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार

लोणावळा : सहा वर्षाचा कुत्रा मृत्यू पावल्याप्रकरणी बंगला मालकाने केअर टेकरच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी घडली आहे.    आयेषा समिर वशी (वय ४९, युनियन पार्क, खार वेस्ट मुंबई) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आयेषा वशी याचा तुंगार्ली येथील डीन विला सोसायटीमध्ये बंगला आहे. वशी ह्या कलाकार असून विविध भाषिक सिनेमामध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांनी सहा वर्षांपुुर्वी बं गल्यावर दोन कुत्र्याची पिल्ले आणून ठेवली होती. त्याचा केअर टेकर राम आंद्रे हे या कुत्र्याची देखभाल करत असे. १३ सप्टेंबर रोजी आंद्रे यांनी वशी यांना फोन करून सांगितले की, त्यांनी सांभाळायला दिलेल्या दोन कुत्र्यांपैकी रकी नावाचा कुत्रा हा पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये पडून मृत्यू झाला आहे. मात्र कुत्र्याच्या नाका तोंडातून कानातून रक्त येत असल्याने वशी यांनी पशू वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथील डाॅ. गायकवाड व डाॅ. मेश्राम यांना सांगितल्यानंतर ह्या कुत्र्याचे शवविच्छेदन केले असता त्याचा मृत्यू श्वास गुदमरून झाला असल्याचे स्पष्ट झाले. यावरून वशी यांनी केअर टेकर आंद्रे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सदर कुत्र्याला आंद्रे यांनीच मारले असल्याच्या संशयावरून वशी यांनी त्याच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार आंद्रे यांच्यावर भादंवि कलम ४२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर घटनेचा तपास सुरू आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdogकुत्रा