शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पैशांसाठी मालकानेच केला चोरीचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:35 IST

गाडीच्या विम्याची १८ लाख रुपयांची रक्कम मिळावी, या हव्यासाने गाडीमालकांनी मोटार गाडी चोरी झाल्याचा बनाव केला.

हडपसर : गाडीच्या विम्याची १८ लाख रुपयांची रक्कम मिळावी, या हव्यासाने गाडीमालकांनी मोटार गाडी चोरी झाल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांनी त्याचा बनाव उघडा पाडला आहे.हडपसर पोलीस ठाण्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व पोलीस नाईक विनोद शिवले यांना गस्तीदरम्यान एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली, की काही दिवसांपूर्वी हडपसर भागातून एक मोटार गाडी (एमएच १२ पीक्यू २९७५) चोरीस गेली. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.या गुन्ह्यातील गाडी ही चोरीस गेली नसून ती फिर्यादीने विम्याच्या पैशासाठी गाडी मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील सीमेलगत एका गावामध्ये लपवून ठेवली होती. ती गाडी हडपसर मांजरी भागात फिरत असून त्या गाडीची नंबरप्लेट लावलेली नाही. बातमीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक भांगे यांचे गस्ती पथक फिरत असताना सोलापूर महामार्गावर मांजरी फाटा येथे ही गाडी उभी असल्याची दिसली. गाडीबद्दल संशय असल्याने लगेच पोलिसांनी गाडीतील चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव किरण दत्तात्रेय जाधव (वय २४, रा. पापडेवस्ती, मूळ रा. खामकरवाडी, उस्मानाबाद, बार्शी ) असे असल्याचे सांगितले.त्याच्याकडे गाडीची नंबरप्लेट, गाडीच्या कागदपत्रांबाबत चौकशी करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याला हडपसर पोलीस ठाण्यते आणून अधिक चौकशी केली.ही गाडीही मध्य प्रदेश येथील एकास विकण्याचे ठरले होते. परंतु इन्शुरन्स कंपनीला आवश्यक असणारा पोलिसांचा अंतिम अहवाल प्राप्त न झाल्याने गाडीचा व्यवहार होऊ शकला नाही. त्याकरिता हडपसरमध्ये आलो होतो, असे जाधव यांनी सांगितले. पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी गाडी चोरीस गेल्याची खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याने फिर्यादीकडून या गुन्ह्याकामी गाडी जप्त करून खोटी तक्रार दिल्याबाबत लष्कर न्यायालयात खटला दाखल केला आहे.>किरण जाधव याने सांगितले, की गाडी व्यवसायाकरिता विकत घेतली होती. परंतु फायनान्स हप्ते भरणे शक्य नसल्याने त्याने त्याची गाडी चोरी केल्याचा बनाव करून एक इफको टोकियो इन्शुरन्स कंपनीकडून गाडीचे पैसे घ्यायचे व गाडी मध्य प्रदेशमध्ये विकून त्याचेसुद्धा पैसे घ्यायचे, असा बनाव रचला होता.बनावानुसार फिर्यादीने मागील वर्षी २५ सप्टेंबरला गाडीचोरीस गेल्याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही गाडीही प्रथम अहमदनगर, (शिरपूर, जि. धुळे) या ठिकाणी लपवून ठेवली.