ओवेसी यांच्या सभेला परवानगी
By Admin | Updated: February 14, 2017 02:26 IST2017-02-14T02:26:17+5:302017-02-14T02:26:17+5:30
आॅल इंडिया मजलीस ए इत्तेहाद उल मुसलिमीन (एमआयएम) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेला अखेर परवानगी

ओवेसी यांच्या सभेला परवानगी
पुणे : आॅल इंडिया मजलीस ए इत्तेहाद उल मुसलिमीन (एमआयएम) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता भवानी पेठेतील टिंबर मार्केट येथे सभा होईल.
ओवेसी यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर अंजुम इनामदार व जुबेर शेख यांनी पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ व विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त पाठक यांची भेट घेतली़ त्यानंतर त्यांनी सभेला परवानगी देण्यास मान्यता दिली असल्याचे अंजुम इनामदार यांनी सांगितले़ आमदार इम्तियाज जलील, प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन, प्रदेश कोअर कमिटीचे सदस्य अंजुम इनामदार, रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्षनेते राहुल डंबाळे, जुबेर शेख या वेळी उपस्थित राहणार आहेत़