ओव्हरटेक केल्याच्या रागातून चालकाला मारहाण
By Admin | Updated: May 4, 2017 23:53 IST2017-05-04T23:53:55+5:302017-05-04T23:53:55+5:30
ओव्हरटेक केल्याच्या रागातून चालकाला दोघांनी काठी व पट्ट्याने डोक्यात मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना

ओव्हरटेक केल्याच्या रागातून चालकाला मारहाण
ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 4 - ओव्हरटेक केल्याच्या रागातून चालकाला दोघांनी काठी व पट्ट्याने डोक्यात मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास येथील सोमाटणे टोलनाका येथे मुंबई – पुणे महामार्गावर घडली. दोन्ही आरोपी मनसेचे पदाधिकारी असल्याचं वृत्त आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका खासगी मालकीच्या स्टोन क्रशरचा (एम एच १४ सी पी ३२७२) क्रमांकाचा हायवा चालक दिनकर बाबुराव होळकर (वय ४७, रा. वडगाव ता. मावळ) हे मुंबई – पुणे महामार्गावरून सोमाटणे बाजूला निघाले होते.मात्र यात हायवा सोमाटणे टोलनाक्याजवळ आला असता, हायवा चालक दिनकर होळकर यांना तू ओव्हरटेक का केले असे विचारून आरोपी सतीश शंकर शिंदे व सुनील शंकर शिंदे (दोघे रा. टकलेवस्ती तळेगाव दाभाडे ता. मावळ) यांनी त्यांच्या डोक्यात काठी व पट्ट्याने मारहाण करून जखमी केले शिवीगाळ व दमदाटी केली.
यात हायवा चालक होळकर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात आले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.