पीएमपीमध्ये ओव्हरटाईम बंद

By Admin | Updated: April 13, 2017 03:57 IST2017-04-13T03:57:08+5:302017-04-13T03:57:08+5:30

खर्चात कपात करण्यासाठी कर्मचाऱ्यांना जादा वेळेचे (ओव्हरटाईम) काम देणे बंद करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने घेतला आहे. उपलब्ध वेळेचाच

Overtime off in PMP | पीएमपीमध्ये ओव्हरटाईम बंद

पीएमपीमध्ये ओव्हरटाईम बंद

पुणे : खर्चात कपात करण्यासाठी कर्मचाऱ्यांना जादा वेळेचे (ओव्हरटाईम) काम देणे बंद करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने घेतला आहे. उपलब्ध वेळेचाच सक्षमपणे पूर्ण वापर करण्याच्या सूचना पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी
दिल्या आहेत.
‘पीएमपी’ बसच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असून नियोजनाअभावी ओव्हरटाईम करावा लागतो. सुट्ट्यांनुसार कामाचे विस्कळीत नियोजन तसेच राजकीय हस्तक्षेपानुसार ठराविक कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कामामुळे नियोजन करताना कसरत करावी लागते. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना जादा वेळेत काम करणे भाग पडते. कर्मचाऱ्यांनी ठरलेल्या वेळेत शिस्तबद्ध काम करावे, असे मुंढे यांनी सांगितले आहे. तसेच, वाहक व चालकांना दररोज रोखीने दिला जाणारा वीस रुपयांचा चहाभत्ता यापुढे त्यांना त्यांच्या वेतनात देण्याच्या सूचनाही मुंढे यांनी दिल्या आहेत. पीएमपीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहान भत्ता दिला जातो. या भत्त्याच्या स्वरूपातही बदल करण्याचा निर्णय या बैठकीत
घेण्यात आला.

Web Title: Overtime off in PMP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.