शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

द्राक्ष बागायतदारांची संकटावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 03:26 IST

हक्काचे उत्पादन मिळवून देणा-या फळबागा अवकाळीच्या संकटामुळे शेतक-यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहेत. फळबागांवर खर्च करणे म्हणजे जुगारावर पैसे लावण्याचा अनुभव शेतक-यांना येत आहे.

बारामती : हक्काचे उत्पादन मिळवून देणा-या फळबागा अवकाळीच्या संकटामुळे शेतक-यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहेत. फळबागांवर खर्च करणे म्हणजे जुगारावर पैसे लावण्याचा अनुभव शेतक-यांना येत आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचे द्राक्ष, डाळिंब बागांवर आता परिणामझाला होता. मात्र योग्य नियोजनामुळे शेतकºयांनी याही संकटावर मातकेली आहे.बाजारात द्राक्षाचे दर चढे आहेत. त्यामुळे आता अवकाळीचा फेरा नको, अशी प्रार्थना शेतकरी करीत आहेत.उसाचे आगार म्हणून ओळखले गेलेल्या बारामती-इंदापूर तालुक्यांच्या बागायती पट्ट्यात द्राक्ष बागांनी क्षेत्र व्यापले आहे, तर जिरायती भागाला वरदान ठरलेल्या डाळिंबाने येथील शेतक-यांचा आर्थिक स्तर उंचावला. मात्र द्राक्ष बागांना सातत्याने अवकाळी पावसाचा व खराब हवामानाचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या वर्षीदेखील लांबलेल्या पावासाचा परिणाम द्राक्ष बागांवर झाला होता. त्यातूनही शेतकºयांनी मेहनतीने बागा जपल्या होत्या. मात्र मागील आठवड्यातील अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदारांची झोप उडवली होती. आगाप बागांमध्ये मणी फुटण्याचे प्रकार घडले तर उशिरा छाटण्या केलेल्या बागांमध्ये डाऊनी, भुरी रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र शेतकºयांनी दिवसरात्र एक करून बागा रोगांपासून वाचवल्या आहेत. अवकाळी पावसामुळे द्राक्षाच्या एकरी उत्पादन खर्चात वाढ झाली. मात्र द्राक्षांचे बाजारही तेजीत असल्याने आता अवकाळीचा फेरा नको अशी प्रार्थना शेतकरी करीत आहे.गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदापूर तालुक्यातील बोरी गावातील माल आखाती देशात दरवर्षी निर्यात होत असतो. या भागातील काझड, लासुर्णे, बिरंगुडी, कळस आदी गावांतील शेतकरी निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेत असतो.नारायणगाव जम्बो, नानासाहेब पर्पल, माणिक चमन, एसएस, आरके, शरद सिडलेस या जातींच्या द्राक्षांना आखाती देशात मोठी मागणी असते. सध्या ‘शरद सिडलेस’ या जातीच्या निर्यातक्षम द्राक्षांना प्रतिकिलो १०० ते ११० रुपये दर मिळत आहे. तर नारायणगाव जम्बो जातीच्या द्राक्षांना प्रतिकिलो १३० ते १३५ रुपयांपर्यंत निर्यातदार दर देत आहेत.बाजारात द्राक्षाचे दरचढे आहेत. त्यामुळे आता अवकाळीचा फेरा नको,अशी प्रार्थना शेतकरी करीतोयमाझ्या बागेची उशिरा छाटणी केली आहे, अवकाळी पावसामुळेधास्ती होती. मात्र नियमित फवारण्या व योग्य काळजी घेतल्याने आता बागेमध्ये रोग दिसत नाही. द्राक्षाचा बाजार असाच तेजीत राहिल्यास शेतकºयांच्या मेहनतीचे चिज होणार आहे.- दादासाहेब सांगळेद्राक्ष उत्पादक शेतकरी,बिरंगुडी-कळस

टॅग्स :Farmerशेतकरी