डीपी रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांमध्ये संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:11 IST2021-03-15T04:11:34+5:302021-03-15T04:11:34+5:30
पुणे : वडगावसशेरीतील सर्व्हे नं. ५५, साईनाथ नगर येथील डीपी रस्त्याचे काम गेल्या १० वर्षांपासून रखडलेले ...

डीपी रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांमध्ये संताप
पुणे : वडगावसशेरीतील सर्व्हे नं. ५५,
साईनाथ नगर येथील डीपी रस्त्याचे काम गेल्या १० वर्षांपासून रखडलेले आहे. तसेच रहदारीचा मुख्य रस्ता बंद केल्याने येथील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी चार सोसाट्यांमधील शेकडो नागरिकांनी रविवारी रस्त्यावर उतरून महापालिकेच्या निषेध नोंदवला.
यावेळी सुरेंद्र पठारे फाऊंडेशचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे, नवनाथ फराटे, उमेश जयस्वाल कुमार प्राईमवेरा सोसायटी, करणरेहा सोसायटी, कुमार परिषद सोसायटी करण सोसायटी आणि एथिना सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पठारे म्हणाले की, येथील सोसायटीतल्या रहिवाशांचा प्रश्न बिकट झाला आहे. महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्ता आणि इतर अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित आहेत. तत्काळ हे प्रश्न सोडवण्यासाठी अनेकवेळा महापालिकेला पत्रव्यवहार केला आहे.
या सोसायटीच्या परिसरातून खराडी-शिवणे रस्ता जातो. याला जोडणारा डीपी रस्ता महापालिकेने मंजूर केला आहे.तसेच मुख्य साईनाथ नगर मधून जुना मुंढवा रस्त्याकडून सोसायटीला जोडणारा रस्ता बांधकाम व्यावसायिक आणि पूर्वीचे खाजगी जागा मालक यांच्यांत वाद सुरू असल्याने पत्रे मारून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. भाजी मंडई मध्ये जाता येत नाही. रहदारीचा रस्ता खोदल्याने महिलांना त्रास होत आहे. दारुड्या व्यक्तींचा त्रास सहन करावा लागतो. असे पुष्पा झागींड, सपना गुप्ता, जेमेनी राठोड आदी महिलांनी सांगितले.
रस्ता ज्या दिवशी बंद करण्यात आला. त्यादिवशीच पाहणी केली. त्यानंतर महापालिकेला पत्रव्यवहार केला. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली आहे. बांधकाम व्यवसायिक आणि पूर्वीचे खाजगी जागा मालक यांच्यांत वाद सुरू आहे. रस्ता येत्या १० ते १५ सुरू करू असे विभागाने सांगितले आहे.
- संदीप जऱ्हाड, नगरसेवक.